MP Pratibha Dhanorkar : महिलांना उद्योगासाठी खासदार प्रतिभा धानोरकर देणार 50 हजार रुपये?

MP Pratibha Dhanorkar 1 हजार रुपये द्या आणि उद्योग सुरू करण्यासाठी खासदार महिलांना देणार 50 हजार रुपये, या अफवेची चंद्रपुरात महिलांमध्ये चांगलीच चर्चा सुरू आहे.

मात्र या गैरसमजामुळे खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात महिला जेव्हा पैसे मागायला आल्या त्यावेळी या अफवेचे बिंग फुटले.

अवश्य वाचा : स्मार्ट वीज मीटर निर्णय रद्द, श्रेय कुणाचे?

MP Pratibha Dhanorkar तात्काळ धानोरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाने खासदार धानोरकर यांच्या नावाने जाहीर आवाहन समाज माध्यमाद्वारे प्रसिद्ध केले.

धानोरकर यांनी आवाहन केले आहे की खासदार प्रतिभा धानोरकर ह्या काही महिलांना उद्योगासाठी 50 हजार रुपये देणार आहे, त्यासाठी प्रत्येक महिलांनी हजार रुपये जमा करावे, मात्र अशी कुठलीही योजना नाही.

महत्त्वाचे : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी

अश्या अनेक तक्रारी प्रतिभा धानोरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात प्राप्त होत असून महिलांनी कुणालाही पैसे देऊ नये, कुणी याबाबत महिलांना पैसे मागत असेल तर त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये सम्पर्क साधावा, कारण जिल्ह्यातील काही भामट्यानी महिलांकडून पैसे वसूल केले असल्याची माहिती पुढे येत आहे, त्याकरिता महिलांनी सतर्क रहावे. असे आवाहन खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!