Sudhir mungatiwar : बामणी प्रोटिन्स कामगारांचा मुद्दा मुख्यमंत्री यांच्या दरबारी

Sudhir mungantiwar कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन कंपनी पुन्हा सुरू करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत आणि यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबई येथे बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर बामणी प्रोटीन्स येथील भारतीय केमिकल वर्कर युनियनच्या कामगारांना दिला.एक महिन्यापासून बंद असलेल्या बामणी प्रोटीन्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या ठिय्या आंदोलन मंडपाला ना. श्री. मुनगंटीवार यांनी भेट देऊन कामगारांची विचारपूस केली.

अवश्य वाचा : खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मुळे कामगाराच्या कुटुंबाला मिळाली 45 लाखाची मदत

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, वन विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदन सिंग चंदेल, वर्कर युनियनचे अध्यक्ष देवराव निंदेकर,महामंत्री जहीरूद्दीन शेख, कार्याध्यक्ष दिनेश गोंदे,उपाध्यक्ष चंद्रशेखर निकोडे,उपाध्यक्ष अशपाक शेख,भाजपा जेष्ठ नेते राजेंद्र गांधी,बाळकृष्ण गोंदे, प्रभाकर वैद्य,मोठ्या संख्येने कामगार उपस्थिती होते.

महत्त्वाचे : पेपरफुटी कायद्यात महत्वाची तरतूद काय?

भारतीय केमिकल वर्कर युनियनचे बामणी प्रोटीन्स अध्यक्ष देवराव नींदेकर यांच्याशी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सविस्तर चर्चा केली. मुंबई येथे मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन समस्येवर तोडगा काढणार असल्याचे सांगून ना. श्री. मुनगंटीवार यांनी कर्मचाऱ्यांना दिलासा दिला. याबाबत पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांना दूरध्वनी करून पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्याबाबत चर्चा देखील केली.

Sudhir mungantiwar बामणी प्रोटीन्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असेही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. तत्पूर्वी, पुढील १-२ दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनीच्या वरिष्ठ अधिका-यांसोबत तसेच कामगार प्रतिनिधी व कर्मचाऱ्यांसोबात झुम बैठक घ्यावी, असेही निर्देश ना. मुनगंटीवार यांनी दिले.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!