Transgender scheme : तृतीयपंथीयांसाठी एखादी योजना आणा – मनसेची मागणी

Transgender scheme संपूर्ण राज्यभर माझी लाडकी बहीण, माझा लाडका भाऊ योजना सरकार राबवित असून योजनेची चर्चा सर्वत्र सुरू आहे. यासाठी महिला व बेरोजगार तरुणांची लगबग ग्रामीण व शहरी भागात दिसत आहे. परंतु समाजातील दुर्लक्षित असलेले आर्थिक दुर्बल व वंचित घटक असलेल्या तृतीयपंथीयांना कोणत्याही योजना नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंद्रपूर तर्फे माझी लाडकी बहिण योजनेसारखी योजना तृतीयपंथीयासाठी ही राबवावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांनमार्फत मुख्यमंत्र्यांना मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी केली.

अवश्य वाचा : मदत छोटीशी मी आपल्या सदैव पाठीशी – प्रतिभा धानोरकर


Transgender scheme तसेच तृतीयपंथीयासाठी सरकार तर्फे राबविण्यात येणारी कल्याणकारी योजनेचा लाभ देखील पोहचत नसून यासाठी शेवटच्या घटकापर्यंत पोहचत नसून याच्या उपाययोजनेसाठी अंमलबजावणी करण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.


यावेळी व्यापारी सेनेचे जिल्हाध्यक्ष महेश शास्त्रकार, रोजगार व स्वयंरोजगार सेनेचे जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर, जील्हासाचिव किशोर मडगुलवार, तालुका अध्यक्ष प्रकाश नागरकर, मनवीसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, ग्रामपंचायत सदस्य विवेक धोटे, महिला सेना शहरअध्यक्ष वर्षा भोमले, कामगार सेनेचे अक्षय चौधरी, मनविसचे करन नायर, सुयोग धनवलकर, मयूर मदनकर, निकी यादव, अनुप माथणकर, शुभम वांढरे व संबोधन संस्थेचे अधक्ष राज कचोरे उपस्थित होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!