Pratibha Dhanorkar खासदार प्रतिभा धानोरकर या आपल्या लोकसभा क्षेत्रातील नागरीकांच्या मदतीसाठी तत्पर असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. आज त्यांच्या प्रयत्नांतून सलग 3 वर्षा आधीच्या रानडुकराच्या हल्ल्यातील जखमींना आपल्या प्रयत्नातून मदत मिळवून दिली.
अवश्य वाचा : वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या मुनीम च्या कुटुंबाला मिळाली वनविभागाच्या वतीने आर्थिक मदत
Pratibha dhanorkar चंद्रपूर जिल्हा हा वन व्याप्त जिल्हा असल्याने वन्य प्राण्यांच्या हल्ल्याच्या अनेक घटना जिल्ह्यात घडत असतात. या हल्ल्यात जखमी नागरीकांना वन विभागाकडून आर्थिक मदत दिली जात असते. परंतु हि मदत अनेकदा वेळेवर मिळत नसल्याची तक्रार खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या कडे प्राप्त झाली होती.
Pratibha dhanorkar सन 2021-22 मध्ये वरोरा तालुक्यातील विविध घटनेत पाच नागरीक रानटी डुकरांच्या हल्ल्यात जखमी झाले होते. परंतु तीन वर्ष लोटूनही त्यांना वन विभागाकडून मदत मिळाली नव्हती. या संदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विशेष प्रयत्न करुन जखमींना तात्काळ मदत मिळण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेश दिले. त्याची फलश्रृती म्हणून आज दि. 24 ऑगस्ट रोजी वन विभागाच्या उपस्थितीत रानटी डुकाराच्या हल्ल्यात जखमी झालेल्ल्या त्या पाच नागरीकांना प्रत्येकी 1 लक्ष 25 हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप खासदार धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या या कामाने जखमी कुटूंबातील सदस्यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांचे आभार मानले.
आंदोलन : महिला अत्याचाराविरोधात चंद्रपुरात महाविकास आघाडीचे तोंडाला काळ्या फिता लावीत निषेध आंदोलन
यावेळी वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा संचालक राजु चिकटे, वरोरा काँग्रेस कमेटीचे ग्रामीण तालुकाध्यक्ष मिलिंद भोयर त्या सोबतच वन विभागाचे अधिकारी व नागरीकांची उपस्थिती होती.
विशेष बाब म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार वनमंत्री सुद्धा आहे, त्यांना याबाबत वनविभागाच्या वतीने माहिती देण्यात आली नव्हती काय? त्यांच्याकडे त्या नागरिकांनी आर्थिक मदतीसाठी कधी भेट घेतली की नाही? हे अनेक प्रश्न यावरून उपस्थित झाले असले तर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी तक्रार प्राप्त होताच संबंधितांना मदत का दिली नाही याबाबत वनविभागाला जाब विचारला आणि काही दिवसात 3 वर्षांपासून मदतीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांना मदत मिळाली.
