Chandrapur Assembly Constituency : मला पण आमदार व्हायचंय

Chandrapur Assembly Constituency राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा येत्या काही दिवसात होणार असून नोव्हेंबरमध्ये मतदान होण्याची शक्यता आहे. मात्र त्यापूर्वीचं अनेक इच्छुक व भावी आमदारांनी आपली बॅनरबाजी ने धुमाकूळ माजविला आहे.

Chandrapur Assembly Constituency काही महिन्यांपूर्वी कांग्रेस पक्षाने विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुकांचे अर्ज मागविले होते, लोकसभा निवडणुकीत कांग्रेसला प्रत्येक विधानसभेत मोठी आघाडी मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि कांग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागणाऱ्यांची मोठी रीघ लागली. अनेकांनी मी आमदार या पदासाठी किती सर्वोत्कृष्ट आहो हे दाखविण्याचा अनेकांनी प्रयत्न सुद्धा केला विशेष म्हणजे इच्छुकांच्या भाऊ गर्दीत अनेक आमदार हे पक्षाचे सदस्य देखील सुद्धा नाही.

महत्त्वाचे : मुंबई, पुणे रेल्वेसाठी आता जनआंदोलन

सध्या विधानसभा क्षेत्रात विद्यमान आमदार किशोर जोरगेवार यांनी विकासकार्याचा धडाका लावला आहे, वर्ष 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेतून निवडणूक लढली, त्यांचा पराभव झाला तरी त्यांनी कांग्रेस पक्षाला तिसऱ्या क्रमांकावर ढकलले होते, निवडणूक हरल्यावर किशोर जोरगेवार यांनी 5 वर्षे सतत मतदारांच्या संपर्कात राहून त्यांची कामे केली व 2019 मध्ये अपक्ष निवडणूक लढवीत इतिहास घडविला. Future mla

भाजपच्या विद्यमान आमदाराला पराभवाची धूळ जोरगेवार यांनी चाखायला लावली यावेळी कांग्रेस पक्ष चौथ्या क्रमांकावर गेला. आज जोरगेवार सर्व सामान्य नागरिकांना सर्वश्रुत आहे, जनतेतील लोकनेता म्हणून त्यांचं विधानसभा क्षेत्रात नाव आहे, त्यांना हरविण्यासाठी आज नवख्यानी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

5 वर्षांपासून आमदार जोरगेवार यांनी सर्वसामान्य व शेवटच्या घटकातील नागरिकांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, मॉर्निंग वॉक, कचरा संकलन करणारे असो की विविध लहान दुकानदार यांना आमदार जोरगेवार यांनी भेट दिली. Chandrapur Assembly Constituency

आमदार जोरगेवार यांच्या या कार्याला भावी आमदार भारावून गेले आणि त्यांनी सुद्धा सर्व सामान्य जनतेची भेट घेतली, मात्र प्रतिसाद अत्यल्प होता, मनपा निवडणूक हरल्यावर काहींना आता मीच आमदार होणार असे स्वप्न पडू लागले आहे.

विशेष म्हणजे चंद्रपूर विधानसभेत काहींना उमेदवारी सुद्धा जाहीर झाली, मात्र त्यादिवशीचं कार्यकर्त्यांनी मोठा राडा केला, ते असे भांडले जणू आपला भावी आमदार प्रचंड मताधिक्याने विधानभवनात जाणार असा गैरसमज त्यांच्यामध्ये निर्माण झाला.

यामध्ये काही भावी आमदार यांचा जनसंपर्क केवळ वार्ड पुरती मर्यादित आहे, पक्षाने पद दिल्यावर सुद्धा त्यांनी आपल्या पदाला न्याय दिला नाही, आज भावी आमदार शहरात लहान मोठया सणांचे बॅनर झळकवू लागले आहे, यानिमित्ताने बॅनर व्यवसायिकांचे सुगीचे दिवस आले आहे.

जे जनतेला कधी दिसले नाही ते आता बॅनर मध्ये दिसू लागल्याने नागरिकांनी सुद्धा आश्चर्य व्यक्त केले आहे, आपल्यामागे मोठा जनसागर आहे हे दाखविण्यासाठी अनेकांनी मोर्चा काढला, म्हणजे 10 वर्षात त्यांना जे प्रश्न दिसले नाही ते प्रश्न या विधानसभा निवडणुकीत त्यांना तोंडपाठ झाले आहे.

लोकशाही मध्ये सर्वांना निवडणूक लढण्याचा अधिकार आहे, आणि त्यांनी त्या अधिकाराचा वापर करायला हवा, पण घरी बसून नव्हे. Future mla

सोशल मीडिया व बॅनर लावत आता आम्हीचं जनतेचे प्रश्न सोडवू शकतो असे वातावरण सध्या चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात तयार करण्याचे काम भावी आमदार करू लागले आहे. यामध्ये काहीजण बेरोजगारांना न्याय देण्याची भाषा करताहेत तर काही देश सेवा नंतर नागरिकांची सेवा, काही स्वतःला कांग्रेस पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते असल्याचे भासवीत आहे तर काही आमच्याशिवाय पर्याय नाही असे भासवीत आहे.

इतर पक्ष विधानसभा क्षेत्रात आपलं संघटन वाढवू शकले नाही कारण नेत्यांची इच्छाशक्ती नाही, विधानसभा क्षेत्र हातातून गेल्यावर काही हताश झाले होते, पण ते परत मिळविले असले तरी स्थानिक क्षेत्रात दुर्लक्षचं, अशी आज नेत्यांची स्थिती आहे. Chandrapur Assembly Constituency

विद्यमान आमदार यांनी 5 वर्षात नागरिकांच्या घेतलेल्या भेटी यांची नक्कल आज प्रत्येक भावी आमदार करत असताना दिसत आहे, निवडणूक आली की गोठ्यातून बाहेर यायचं आणि संपली की गोठ्यात 5 वर्षे आराम करायचं अशी पद्धत नेत्यांनी अवलंबिली आहे. काही दिवसात निवडणुकीची घोषणा झाली की समजेल कोण कितने पाणी में है।

क्रमशः

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!