Parivartan mahashakti alliance : राजुरा विधानसभा क्षेत्रात परिवर्तनाचे वारे

Parivartan mahashakti alliance चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रातील निवडणूक यंदा चुरशीची होणार आहे. राज्यात सध्या महायुती, महाविकास आघाडी व आता तयार झालेली परिवर्तन महाशक्ती आघाडी निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे.

Parivartan mahashakti alliance जिल्ह्यातील राजुरा विधानसभा निवडणूक यंदा आव्हानात्मक असणार आहे, कारण माजी आमदार वामनराव चटप हे परिवर्तन करायला तयार असून 21 ऑक्टोबर रोजी तिसऱ्या आघाडीने वामनराव चटप यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

राजकीय : सुधीर मुनगंटीवार सातव्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

वामनराव चटप हे परिवर्तन महाशक्ती आघाडीचे अधिकृत उमेदवार आहे, शेवटच्या घटकातील नागरिकांना चटप यांचं नाव तोंडपाठ आहे, साधी सरळ विचारसरनी असलेले वामनराव चटप यांनी शेवट वर्ष 2019 मध्ये निवडणूक लढवली होती, त्या निवडणुकीत 3 मतांपेक्षा कमी मतांनी त्यांचा पराभव झाला, मात्र न खचता त्यांनी विधानसभा क्षेत्रात आपलं काम निरंतर सुरू ठेवले.

गुन्हेगारी : स्थानिक गुन्हे शाखेने पकडली अवैध दारू

उत्कृष्ट संसदपटू, वक्ता म्हणून चटप यांची ओळख आहे, विशेषकरून सामान्य जनतेत मिसळणारे एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणून चटप यांचं नाव सर्वात आधी घेतल्या जाते, वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनात वामनराव चटप यांनी झोकून दिले, वेगळा विदर्भ झाल्याशिवाय शांत बसणार नाही अशी आक्रमक भूमिका चटप यांची आहे.

या विधानसभा निवडणुकीत कांग्रेसचे विद्यमान आमदार धोटे यांच्या विजयात वामनराव चटप हे अडसर ठरू शकतात, परिवर्तन महाशक्ती आघाडी द्वारे यंदा राजुरा विधानसभा निवडणुकीत परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!