Farmer Producer Company
Farmer producer company मुल – (गुरु गुरनुले) मुल तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी प्रोडूसर कंपन्या आहेत. या कंपन्या शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन केल्या असताना सुद्धा ते शेतकऱ्यांना कुठलाही लाभ न देता स्वतः चाच स्वार्थ साधत असल्याने व स्वहिताकडेच जास्त लक्ष देत असून शासनाची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट करीत असल्याचे विदारक चित्र आहे.
अशा कंपन्यांची शासन स्तरावरून संबंधित विभागाकडून तपासणी करण्यात यावी व योग्य चौकशी करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. Farmer producer company
चंद्रपुरात भाईगिरी चे वाढते ट्रेंड
शेतकरी उत्पादक कंपनी (FPC) ही सहकारी संस्था आणि खाजगी मर्यादित कंपन्यांमधील संकर आहे. भारतीय कंपनी कायदा, 2013 अंतर्गत नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये लोकशाही शासन असते.
शेतकरी उत्पादक कंपनी कायदा १९५६ कलम ५८१ ऐ ते ५८१ झेड टी नुसार शेतकरी उत्पादक कंपनीची संकल्पना आली आहे.
उत्पादन,कापणी,खरेदी,प्रतवारी,संकलन,हाताळणी,प्रक्रिया,बाजारपेठ,विक्री, सदस्यांच्या प्राथमिक उत्पादंनांची निर्यात किंवा त्यांच्या लाभाकरीता उत्तम प्रतीच्या सेवांची आयात करणे हा संस्थेच प्राथमिक उद्देश आहे. प्रक्रिया अंतर्गत साठवणूक,माल सुकविणे,प्रतवारी,ग्रेडेशन,जाहिरात आणी सदस्यांच्या मालाचे पॅकिंग करणे इत्यादी कार्य कंपनीला करावे लागते. Farmer producer organization
शेतकरी उत्पादक कंपनीचे व्यवस्थापन :-
उत्पादक कंपनी स्थापन करण्याकरिता कमीत कमी ५ व जास्तीत जास्त १५ संचालकांची नोंदणी करता येते.
शेतकऱ्यांच्या आर्थिक हितासाठी ही कंपनी स्थापन केल्या जाते. शेतकरी उत्पादक कंपनी अंतर्गत शेती संबंधित अनेक कामे करावी लागतात. Farmer producer organization
चंद्रपूर जिल्ह्यातील महिला व्यापारी बेपत्ता
कंपनीतील शेतकरी सभासदांसाठी तसेच बाहेरील शेतकऱ्यांसाठी अनेक उपक्रम राबवून शेतकऱ्यांच्या हितासाठी कंपनीला शासनाच्या नियमानुसार कामे करावी लागतात.
तालुक्यात अनेक संस्था कार्यरत असून या संस्था स्वहितासाठी स्थापन केल्या असून शासनाकडून उपक्रम राबवित असल्याच्या नावावर आर्थिक निधी प्राप्त करीत असून अशा कंपन्यांची तालुका स्तरावरून सविस्तर चौकशी करण्याची मागणी तालुक्यातील व परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. अशीच परिस्थिती इतरही तालुक्यात असल्याची चर्चा केली जात आहे.