Republic day 2025 | SNDT महिला विद्यापीठात ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा

Republic day 2025

Republic day 2025 : एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ मुंबईचे, महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल, बल्लारपूर येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी बल्लारपुर आवाराचे संचालक डॉ. राजेश इंगोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ. कविता खोलगडे, क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक, एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ, मुंबई या उपस्थित होत्या.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोशन यादव यांना राष्ट्रपती पदक जाहीर

ध्वजारोहनानंतर झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांचे  स्वागत कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. राजेश इंगोले यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. यावेळी मंचावर सहाय्यक कुलसचिव डॉ. बाळू राठोड, बल्लारपूर आवाराचे समन्वयक डॉ. वेदानंद अलमस्त आणि प्रा. खुशबू जोसेफ उपस्थित होते. (Sndt woman university)

डॉ. कविता खोलगडे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्रजासत्ताक दिनी प्रत्येकांनी आपले कर्तव्य ओळखून त्यानुसार कार्य करायला पाहिजे, सोबतच विद्यार्थ्यांना निरोगी जीवनशैलीचे महत्त्व पटवून दिले आणि शारीरिक शिक्षणाचे महत्त्व विषद केले.

सोबतच आधुनिक युगात फिटनेस ही जीवनाची गरज बनली आहे आणि प्रत्येकाने आपली क्षमता ओळखून स्वतःचा विकास साधायला हवा असे प्रतिपादन केले.

डॉ. राजेश इंगोले यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना भविष्याच्या संधींविषयी माहिती देत संविधानाच्या मूल्यांवर उभे राहून आपण राष्ट्र उभारणीसाठी योगदान दिले पाहिजे व प्रत्येक विद्यार्थ्याने राष्ट्राच्या प्रगतीचा भाग बनावे या करिता प्रयत्न केले पाहिजे असे मत व्यक्त केले.

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात विद्यापीठाच्या एन.एस.एस व सांस्कृतिक विभागातर्फे वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागासाठी विद्यार्थिनींना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

नुकतेच पार पडलेल्या वातावरण बदल आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजनात स्वयंसेवक म्हणून काम केलेल्या सर्व विद्यार्थिनींचे यावेळी कौतुक करण्यात आले.

एन.एस.एस. विभागाच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. खुशबू जोसेफ, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. श्रुतिका राऊत यांनी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी अथक प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे संचालन प्रा. अपेक्षा पिंपळे यांनी केले आणि आभार प्रा. खुशबू जोसेफ यांनी मानले. या प्रसंगी एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ बल्लारपुर आवाराचे शिक्षक, शिक्षकेत्तर अधिकारी-कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment