Obstruction of Government Work | चंद्रपूर मनपा पथकाला शिवीगाळ व धमकी

Obstruction of Government Work

Obstruction of Government Work : मालमत्ता व नळकर वसुली करणाऱ्या मनपा पथकास शिवीगाळ केल्या प्रकरणी राजीव गांधी नगर एकता चौक येथील संगीता किशोर भेलोंडे व इतरांवर भारतीय न्याय संहिता कलम 221 व 352 नुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत चंद्रपूर महानगरपालिकेने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असुन शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांचा अश्लील शिवीगाळ करतांनाचा व्हिडीओ पुरावा म्हणुन सादर करण्यात आला आहे.  

महिला पोलिसाची गैरवर्तणुक, 82 वर्षीय वृद्धाने पोलीस अधिक्षकाकडे केली तक्रार


   बुधवार 26 फेब्रुवारी रोजी मनपा कर वसुली पथक राजीव गांधी नगर, एकता चौक येथील संगीता किशोर भेलोंडे या थकबाकीदाराकडे कारवाई करण्यास गेले असता त्यांनी कर भरणा करण्यास नकार देऊन इतर लोकांच्या मदतीने मनपा पथकास शिवीगाळ करण्यास सुरवात केली. Chandrapur Police Complaint

Property Tax Chandrapur

कर भरणा न केल्यास 2 दिवसानंतर नळ कपात व मालमत्ता जप्त करण्याच्या सुचना त्यांना यापुर्वी देण्यात आल्या होत्या,मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष करून मनपा कर्मचाऱ्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. त्यामुळे मनपातर्फे भारतीय न्याय संहिता कलम 221 व 352 नुसार गुन्हा दाखल करण्यास रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.


   कर भरणा करण्याचा शेवटचा महिना मार्च असल्याने थकबाकीदारांकडे मनपा कर वसुली पथकाद्वारे वसुली मोहीम राबविली जात आहे. करवसुली करिता महानगरपालिकेतर्फे 15 पथके नेमण्यात आली असुन प्रत्येक पथकाला दर दिवशी किमान 10 मालमत्ता धारकांवर कारवाई करण्याचे तसेच जप्तीसोबतच मालमत्तांचे नळ कनेक्शन खंडित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. Water Tax Recovery Chandrapur

त्यानुसार आतापर्यंत 60 नळ कनेक्शन खंडित करण्यात आले असुन 106 मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. तरी जप्तीची कारवाई टाळण्यासाठी त्वरित कराचा भरणा करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

Leave a Comment