Maharashtra municipal administration awards । राज्यभरातून चंद्रपूरचा गौरव! मनपाला मिळाले प्रतिष्ठेचे ‘राजीव गांधी पुरस्कार’

Maharashtra municipal administration awards

Maharashtra municipal administration awards : चंद्रपूर 22 एप्रिल  :- चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये राबवलेल्या नागरी उपक्रमांसाठी आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांना राजीव गांधी गतिमान प्रशासन पुरस्कार 2023-24 आणि 2024-25 या वर्षातील दोन पुरस्कारांद्वारे मुंबई येथे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते नागरी सेवा दिनानिमित्त सन्मानित करण्यात आले. Chandrapur Municipal Corporation news

चंद्रपुरात उष्णतेचा कहर, शाळांना ५ दिवसांची सुट्टी जाहीर करा

   2023-24 वर्षाकरीता मालमत्ता कराची नॅच प्रणाली यशस्वीरित्या राबविल्याबद्दल व 2024-25 ला सौंदर्यीकरण अभियान, जलाशय व पाणीसाठे यांची स्वच्छता, शाळा इमारत नूतनीकरण, सुंदर माझे उद्यान व सुंदर माझी ओपन स्पेस स्पर्धा, रस्त्यांचे सुशोभिकरण, विविध शिल्प उभारणी इत्यादी विविध कार्ये यशस्वीरीत्या राबविल्याबद्दल महानगरपालिका गटात तिसरा पुरस्कार चंद्रपूर मनपाला मिळाला आहे. ही सर्व कार्ये आयुक्त विपीन पालीवाल यांच्या कार्यकाळात झाली असल्याने त्यांना राजीव गांधी गतिमान प्रशासन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. Rajiv Gandhi Administrative Awards 2024


  महानगरपालिका स्तरावरून थेट प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांच्या गटामध्ये ही निवड करण्यात आली आहे. प्रशासन लोकाभिमुख करणे, त्यात निर्णयक्षमता आणणे आणि सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्यासाठी वर्ष 2023-24 आणि वर्ष 2024-25 यां दोन वर्षांत राज्यस्तरावर तसेच तालुका, जिल्हा, विभागीय स्तरावर व महानगरपालिका स्तरावर “राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान राबविण्यात आले. या स्पर्धेत सहभागी सर्व कार्यालय व अधिकाऱ्यांचे विविध निकषांवर परीक्षक मंडळाकडून परीक्षण करून सदर पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.


    अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले,उपायुक्त संदीप चिंद्रवार,विधी अधिकारी अनिलकुमार घुले शहर अभियंता विजय बोरीकर,उपअभियंता रवींद्र हजारे,संगणक अभियंता अमुल भुते या चंद्रपूर मनपाचे सर्व अधिकारी-कर्मचारी यांचे व शहरातील नागरिकांचे अभियानात सहकार्य मिळाल्याबद्दल आयुक्तांनी आभार मानले आहेत.  


2024-25 चा पुरस्कार – मनपाने राबविलेल्या सुंदर माझे उद्यान ” व ” सुंदर माझी ओपन स्पेस स्पर्धेत लोकसहभागाने मोठ्या प्रमाणात उद्याने व विविध भागांचे सौंदर्यीकरण व सुशोभीकरण करण्यात आले होते. जवळपास 3400 नागरिक यात प्रत्यक्ष -अप्रत्यक्षरीत्या सहभागी झाले होते. विविध शिल्प व कारंजे चौक सौंदर्यीकरण अंतर्गत उभारण्यात आले. मनपाच्या 15 शाळा या भौतिक सोयी सुविधांनी सुसज्ज करण्यात येऊन या शाळांना आयएसओ मानांकन सुद्धा मिळाले. विद्यार्थी नागरिक,स्वयंसेवी संस्था यांच्याशी जुळुन प्रशासन आणि नागरिक यांच्या समन्वयाने विविध उपक्रम राबविण्यात आल्याने या वर्षीचा पुरस्कार सुद्धा मनपास प्राप्त झाला.  Rajiv Gandhi Administrative Awards 2024

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!