Frequency of tiger attacks in Chandrapur region
Frequency of tiger attacks in Chandrapur region : चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष टोकाला पोहचला असून २७ मे रोजी वाघाने मूल तालुक्यात दोघांना ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मागील १७ दिवसात वाघाने ११ नागरिकांची शिकार केली असून ५ महिन्यात २३ नागरिकांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला.
पतीसमोर वाघाने पत्नीला नेले फरफटत
पहिल्या घटनेत मूल तालुक्यातील कांतापेठ गावातील ५२ वर्षीय सुरेश मुंगरु सोपानकार हा मंगळवारी चिरोली मार्गावरील जंगलात बकऱ्या चारण्यासाठी गेला होता, दुपारच्या सुमारास बकऱ्याचा कळप गावात परतला मात्र सुरेश हा न परतल्याने गावातील नागरिकांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली. गावकरी व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी चिरोली मार्गावरील जंगलात शोधमोहीम राबवली असता सुरेश चा छिन्न विछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळला, सुरेशचा पूर्ण पाय वाघाने खाऊन टाकला होता. Wildlife conservation and human conflict in Chandrapur
पतीसमोर पत्नीला नेले फरफटत
दुसऱ्या घटनेत मूल तालुक्यातील भगवानपूर मधील जंगल परिसरात बांबूच्या बारीक काड्या, सरपण आणि कुड्याची फुले आणण्याकरिता चिरोली गावातील ४५ वर्षीय संजीवनी मैकलवार हि महिला पती संजय मैकलवार, नातेवाईक कवडू बोमनवार, शांताबाई कवडू बोमनवार हे चौघे वनविकास महामंडळाच्या कंपार्टमेंट क्रमांक ५२४ मध्ये सकाळी ९ वाजताच्या सुमारास गेले होते. अचानक झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने संजीवनी वर हल्ला केला, संजीवनी ला पती व नातेवाइकांसमोर वाघाने फरफटत नेले, पती व त्यांच्या नातेवाईकांनी आरडाओरडा करीत वाघाला हुसकावून लावले मात्र तोपर्यंत संजीवनीचा मृत्यू झाला होता. Tiger attacks in villages near Chandrapur forests
या घटनेनंतर गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, यावेळी वनविकास महामंडळाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.बी.बोथे,वनपाल शिंदे, कर्मचारी गव्हारे,अशोक सिंघण, टोलेवाही येथिल पोलिस पाटिल संगिता चल्लावार,चिरोली येथील पोलिस पाटिल गोकूळ मोहूर्ले,चिरोली येथील वनरक्षक सविता गेडाम,प्राणीमित्र उमेश झिरे आणि मूल येथील प्रभारी पोलिस निरिक्षक सुबोध वंजारी घटनास्थळी दाखल झाले.
हल्ल्याचे सत्र
मे महिन्यात तेंदूपत्ता हंगाम सुरु झाल्यापासून वाघाने आपला आतंक सुरु केला आहे, १० मे पासून वाघाने सतत हल्ले करीत आतापर्यंत ११ नागरिकांची शिकार केली आहे, वाघाचे हल्ले नियंत्रणात यावे यासाठी वनविभागाने ठोस पाऊले उचलली नसल्याने नागरिकांचे बळी जात आहे. मागील ५ महिन्यात २३ नागरिक वाघाच्या हल्ल्यात बळी पडले आहे.
