shivaji maharaj history in new education policy । शिवाजी महाराजांचा इतिहास NEP मध्ये; खासदार प्रतिभा धानोरकर यांची मागणी पूर्णत्वास

shivaji maharaj history in new education policy

shivaji maharaj history in new education policy : चंद्रपूर : महाराष्ट्राच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागृत करण्यासाठी, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात (NEP) छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास समाविष्ट करण्याची मागणी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली होती. या मागणीला केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिल्ली येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत सकारात्मक प्रतिसाद देत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. national education policy 2025 latest updates

चंद्रपुरात ब्लॅकआउट?

छत्रपती शिवाजी महाराज देशातील युवांसाठी प्रेरणास्रोत

खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी आपल्या पत्र क्र. १७३२/२०२५, दिनांक १४ एप्रिल, २०२५ द्वारे मागणी केली होती की, छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि कार्य केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर संपूर्ण देशातील युवा पिढीसाठी प्रेरणास्रोत आहे. त्यांची शौर्यगाथा, कुशल प्रशासन आणि प्रजाहितदक्ष धोरणे विद्यार्थ्यांना राष्ट्रनिर्माण आणि नैतिक मूल्यांची शिकवण देतील. त्यामुळे, त्यांचा इतिहास राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. educational reforms in india 2025

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या मागणीची दखल घेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे योगदान देशाला नेहमीच प्रेरणा देत राहील आणि त्यांच्या कार्याचा समावेश अभ्यासक्रमात केल्यास विद्यार्थ्यांमध्ये योग्य दृष्टिकोन निर्माण होईल, असे स्पष्ट केले होते.

या महत्त्वपूर्ण प्रयत्नांमुळे, आता लवकरच राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा समावेश होणार आहे, ज्यामुळे देशभरातील विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्याची माहिती मिळू शकेल. हा निर्णय युवा पिढीला राष्ट्रभक्ती आणि नैतिक मूल्यांची शिकवण देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल, असे खासदार धानोरकर यांनी म्हटले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!