ganja smuggling caught by police
ganja smuggling caught by police : चंद्रपूर शहरात गांजा विक्री करण्याकरिता थेट गडचिरोली जिल्ह्यातून आलेले शेतकरी रामनगर पोलिसांच्या जाळ्यात अडकले, आरोपीकडून १ लक्ष ४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गडचिरोली मधून निसटला आणि चंद्रपुरात अडकला
६ जून रोजी दोघेजण गांजा विक्री साठी चंद्रपुरात येणार अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली, माहितीच्या आधारे रामनगर पोलिसांनी डॉ. वरगंटीवार हॉस्पिटल समोरील मोकळ्या मैदानात सापळा रचला. farmers caught selling cannabis
सायंकाळी ७ वाजेदरम्यान दोघेजण गांजा विक्री साठी आले असता रामनगर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत विचारपूस केली. दोघांची अंगझडती घेतली असता एका प्लास्टिक पन्नी मध्ये गांजा झाडाचे पाने, फुले, बोन्डे व बिया वजन १ किलो ७८१ ग्राम किंमत ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल एमएच ३३ एएफ ९५८६ किंमत ९५ हजार रुपये असा एकूण १ लक्ष ४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गडचिरोली मध्ये शेती, चंद्रपुरात गांजा विक्री
आरोपी ३८ वर्षीय अजित रतन रॉय, २९ वर्षीय सत्यजित गौरन्ग मंडल काम शेती, दोघे राहणार उदयनगर, मुलचेरा जिल्हा गडचिरोली यांच्यावर एनडीपीएस अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली. inter district ganja smuggling case
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात रामनगर पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांच्या नेतृत्वात सपोनि देवाजी नरोटे, हनुमान उगले, पोलीस कर्मचारी जितेंद्र आकरे, आनंद खरात, सचिन गुरनुले, पेतरस सिडाम, प्रशांत शेंद्रे, लालू यादव, शरद कुडे, मनीषा मोरे, रवीकुमार ढेंगळे, संदीप कामडी, हिरा गुप्ता, पंकज ठोंबरे, प्रफुल पुप्पलवार, शक्ती कोरेवार व ब्ल्यूटी साखरे यांनी केली.
