Police Swift Action
Police Swift Action : चंद्रपूर – पाणी बॉटल घ्यायला गेला पण मागून कुणीतरी तोंड दाबून खिशातील ५० हजार रुपये जबरी हिसकावून नेले, हि घटना इतरत्र जिल्ह्यात नाही तर चंद्रपूर शहरात घडली आहे. पोलिसांच्या तत्पर तपासाने आरोपी पोलिसांच्या तावडीत २४ तासाच्या आत सापडला.
१३ जून रोजी कांकेर जिल्हा राज्य छत्तीसगड येथे राहणार ३४ वर्षीय मधुराम तुलसींग कोल्हा हा तामिळनाडू राज्यातून मजुरीचे काम करीत ११ जून ला तिरपुर रेल्वे स्टेशन येथून १२ जूनला सकाळी १० वाजता चंद्रपूर रेल्वे स्टेशन येथे पोहचला. forced pocket robbery Chandrapur city
शेतीच्या वादात शेतकऱ्याला मारहाण
मधुराम च्या गावाकडे जाणारी बस हि १३ जून ला सकाळी ५ वाजता असल्याने मधुराम १२ जून रोजी रात्री ८ वाजता जलनगर वॉर्ड सपना टॉकीज येथे पाणी बॉटल घेण्यासाठी गेला असता एका अज्ञात इसमाने मधुराम च्या मागे येऊन त्याच्या तोंडाला दाबून खिशातील ५० हजार रुपये हिसकावून नेले.
याबाबत मधुराम ने तात्काळ रामनगर पोलीस ठाणे गाठत आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला, पोलिसांनी कलम ३०९ (६) अंतर्गत गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला. roadside robbery 50000 rupees Chandrapur
२४ तासांच्या आत कारवाई
घडलेल्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शोध पथकाने सुरु केला, पथकाने तात्काळ घटनास्थळ गाठत तांत्रिकदृष्ट्या व गोपनीय माहितीच्या आधारे ३३ वर्षीय शेख जुबेर शेख कादर राहणार रहेमतनगर याला अटक केली. आरोपी जुबेर जवळून चोरीस गेलेली रोख रक्कम ५० हजार रुपये जप्त करण्यात आले.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथक प्रमुख सपोनि देवाजी नरोटे, सपोनि हनुमान उगले, सपोनि निलेश वाघमारे, पोलीस कर्मचारी पेत्रस सिडाम, शरद कुडे, सचिन गुरनुले, आनंद खरात, प्रशांत शेंद्रे, लालू यादव, जितेंद्र आकरे, मनीषा मोरे, हिरालाल गुप्ता, रवीकुमार ढेंगळे, प्रफुल पुप्पलवार, संदीप कामडी, पंकज ठोंबरे, सुरेश कोरेवार व ब्युलटी साखरे यांनी केली.
