Vrikshmitra competition Chandrapur । 🌳”वृक्ष लावा, ₹21,000 जिंका! चंद्रपूर मनपाची धमाकेदार स्पर्धा!”

Vrikshmitra competition Chandrapur

Vrikshmitra competition Chandrapur : चंद्रपूर 6 ऑगस्ट – वाढत्या उष्णतेचे संकट, हवामानातील असमतोल, वायुप्रदूषण आणि हिरवळीचे घटते प्रमाण या गंभीर समस्यांचा सामना करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत 10 ऑगस्ट 2025 ते 30 ऑगस्ट 2025 या कालावधीत “वृक्षमित्र स्पर्धा 2025” आयोजित करत असल्याची माहिती सहायक आयुक्त शुभांगी सुर्यवंशी यांनी दिली. Chandrapur tree plantation competition

अम्मा चौक वादावर आमदार जोरगेवार यांचं उत्तर

  5 ऑगस्ट रोजी मनपा सभागृहात आयोजीत करण्यात आलेल्या बैठकीत सहभागी सामाजिक संस्थांना स्पर्धेचे निकष व इतर माहिती देण्यात आली. स्पर्धेत आतापर्यंत 25 संघांनी सहभाग दर्शविला आहे. यंदाच्या स्पर्धेचा उद्देश “हरित चंद्रपूर” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवणे, तसेच नागरिक व सामाजिक संस्थांचा सक्रिय सहभाग घेऊन शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व संगोपन करणे हा आहे.स्पर्धेत शहरातील सर्व स्थानिक अशासकीय सामाजिक संस्था,एनजीओ,ओपन स्पेस विकास समिती,क्लब्स,जेष्ठ नागरिक मंडळे,युवक युवती मंडळे तसेच महिला मंडळे सहभागी होऊ शकतात.  
  या प्रसंगी सहायक आयुक्त शुभांगी सुर्यवंशी,उपअभियंता रवींद्र कळंबे,गोपाल मुंदडा,साक्षी कार्लेकर तसेच इतर सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थीत होते. Vrikshmitra green city initiative Chandrapur

स्पर्धेचा उद्देश –  

वाढते तापमान आणि हवामानातील बदल यांना तोंड देण्यासाठी हिरवळ वाढवणे.
प्रत्येक नागरिक व सामाजिक संस्थेमध्ये पर्यावरण संवर्धनाची भावना रुजवणे.
सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांच्या कडेला, मोकळ्या जागेत व सरकारी जमिनीवर वृक्षारोपण करून सौंदर्यवृद्धी व प्रदूषण नियंत्रण साध्य करणे.

सहभागी कोण होऊ शकतात?

नोंदणीकृत व अनोंदणीकृत सामाजिक संस्था (NGO)
विविध क्लब, महिला मंडळे, गणेश मंडळे, क्रीडा संघटना, ज्येष्ठ नागरिक मंडळे
योग व नृत्य गट, सायकल क्लब, बचत गट इ.
(स्पर्धा फक्त गटांसाठी असून वैयक्तिक सहभाग मान्य नाही)


स्थळ निवड अटी –
शासकीय जागा, सार्वजनिक मोकळी जागा, रस्त्यालगतची मोकळी पट्टी.
किमान क्षेत्रफळ – 1000 चौ. फूट किंवा रस्त्यालगत 500 मीटर अंतर.
स्थळाची पूर्वतपासणी महानगरपालिकेमार्फत होईल.


मनपाकडून मिळणारी मदत –
वृक्षांची मोफत उपलब्धता.
तांत्रिक मार्गदर्शन व देखभाल पद्धतीबाबत सल्ला.
गटाची जबाबदारी –
वृक्ष लावणे व त्यांचे संगोपन किमान एक वर्ष करणे.
वृक्षांना ट्री गार्ड (टाकाऊ साहित्यापासून तयार केल्यास अधिक गुण).
वृक्ष संगोपनासोबतच पर्यावरण जनजागृतीसाठी उपक्रम, रॅली, कार्यशाळा आयोजित करणे.


पारितोषिके –
NGO/क्लब श्रेणी:
प्रथम – ₹21,000/-
द्वितीय – ₹15,000/-
तृतीय – ₹11,000/-
प्रोत्साहनपर (3 गट) – प्रत्येकी ₹5,000/-
नागरिक गट श्रेणी –
प्रथम – ₹21,000/-
द्वितीय – ₹15,000/-
तृतीय – ₹11,000/-
प्रोत्साहनपर (3 गट) – प्रत्येकी ₹5,000/-


नोंदणी प्रक्रिया –
इच्छुक गटांनी मनपाने उपलब्ध करून दिलेल्या Google Form द्वारे अथवा उद्यान विभाग, चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये प्रत्यक्ष नोंदणी करावी.
नोंदणीवेळी गटाचे नाव, सदस्यांची यादी, निवडलेले स्थळ व उपक्रमाची संक्षिप्त योजना सादर करावी.
संपर्क –
उद्यान विभाग, चंद्रपूर महानगरपालिका
मो.: 74989 54976, 83291 69743

Leave a Comment