Chandrapur multiple deaths in road crash
Chandrapur multiple deaths in road crash : चंद्रपूर (२९ सप्टेंबर २०२५)- चंद्रपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी घडलेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून ५ नागरिक जखमी झाले आहे. मूल तालुक्यातील जुनासुर्ला हद्दीत दुचाकीला ट्र्क ची धडक बसल्याने २ युवकांचा जागीच मृत्यू झाला तर माजरी मध्ये तेलंगणा राज्यातून नातेवाईकांकडे आलेल्या नागरिकांना चारचाकी वाहनांची धडक बसल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला, या दोन्ही अपघातात एकूण ५ जण जखमी झाले आहे.
चंद्रपुरात दहशत थांबेना , युवकांकडून तलवार, कोयता व चाकू जप्त
२९ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सावली तालुक्यातील पेंढरी मक्ता येथील युवक कापसाला फवारणीचे औषध खरेदी करून मोटरसायकलने गोंडपिपरी – खेडी मार्गे येत असतांना पोलीस स्टेशन मुल अंतर्गत जुनासूर्ला हद्दीत ट्रकने उडविले. या अपघातात सारंग गंडाटे ( वय २६) रा. पेंढरी मक्ता याचा जागीच मृत्यू झाला तर प्रियांशु गंडाटे ( वय २३) रा. पेंढरी मक्ता याचा मुल उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला असून या अपघातात एक युवक जखमी आहे त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. Chandrapur accident latest news
माजरी येथे रविवारी २८ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास एका बोलेरो वाहनाच्या भीषण धडकेत दोन दुचाकींना जोरदार धडक बसून एकाचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले. माजरी कॉलरी ते माजरी वस्ती या मार्गावर नागमंदिरासमोर ही दुर्घटना घडली.
फिर्यादी हॅन्सन प्रकाश राव हे माजरी वस्तीला जात असताना भरधाव बोलेरो (क्र. एमएच ३१ एफसी ६६८७) ने दोन मोटारसायकलींना धडक दिली. पहिल्या मोटारसायकलवर बसलेले जंबोजी व्यंकटचारी, कोंडापर्ती राजमोगली आणि कोंडापर्ती श्रीलता तर दुसऱ्या मोटारसायकलवर बसलेले सपना दत्तू पुरुषोत्तम व जगन्नाथ मलय्या बंडा हे गंभीर जखमी झाले. यातील कोंडापर्ती राजमोगली यांचा उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. fatal road accident Chandrapur district
नातेवाईकाकडे आले आणि…
या अपघातात जखमी झालेले कोंडापर्ती श्रीलता व मृतक कोंडापर्ती राजमोगली हे तेलंगणा राज्यातील गोदावरी खनी येथील रहिवासी असून ते आपल्या नातेवाईक जंबोजी व्यंकटचारी यांच्याकडे माजरीला आले होते. वर्धा – बल्लारशाह या गाडीतून ते माजरी रेल्वे स्थानकावर उतरले, त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी व्यंकटचारी हे मोटारसायकलवर आले होते. त्याचवेळी हा भीषण अपघात झाला. तसेच इतर जखमीही रेल्वे स्थानकावरूनच घरी परतत होते.
दरम्यान, वेकोलिच्या रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना वरोरा आणि नागपूर येथील रुग्णालयांत दाखल करण्यात आले. वेकोलिच्या क्षेत्रीय रुग्णालयात तात्काळ प्राथमिक उपचार देण्यात आले.
अपघातानंतर माजरी पोलिसांनी बोलेरो चालक अजित नथ्थु पावडे याला अटक करून वाहन जप्त केले. आरोपी चालक हा व्यसनी असून अपघाताच्या वेळी दारूच्या नशेत असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत माजरी पोलीस ठाण्यात अप. क्र. ८१/२०२५ नुसार कलम २८१, १२५(अ), १२५(ब), १०६(१) भादंवि तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
