Chandrapur breaking news today tiger attack : चंद्रपूर: २९ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला असून आज २९ नोव्हेम्बरला चंद्रपूर वनविभागाच्या हद्दीत जनावरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला करीत ठार केले. चालू वर्षातील वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील हि ४१ वी घटना असून यामध्ये आतापर्यंत वाघाच्या हल्ल्यात ३७, बिबटच्या हल्ल्यात २, हत्ती व अस्वलाच्या हल्ल्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. २९ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास हि घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
प्रशासनाचा आदेश : जिल्ह्यातील कामगारांना भरपगारी सुट्टी
सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास चंद्रपूर वनपरिक्षेत्रातील चिचपल्ली रेंज कंपार्टमेंट क्रमांक ६९६ मध्ये मंदा तुकूम गावातील रहिवासी ५५ वर्षीय रमेश नागो बोमनवार हे नेहमीप्रमाणे गुरे चारण्यासाठी गेले होते. मात्र त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने बोमनवार यांच्यावर हल्ला करीत ठार केले. घटनेची माहिती वनविभागाला मिळाल्यावर त्यांनी तात्काळ घटनस्थळ गाठत पंचनामा केला. नियमानुसार मृत गुराख्याच्या कुटुंबाला वनविभागातर्फे आर्थिक मदत देण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. Chandrapur breaking news today tiger attack
विभागीय वनाधिकारी राजन तलमले यांनी परिसरातील नागरिकांना आवाहन केले आहे की, वन्यप्राण्यांच्या हालचाली लक्षात घेऊन अशा संवेदनशील वनक्षेत्रात एकटे फिरणे टाळावे आणि सतर्कता बाळगावी. वन्यप्राण्यांबद्दल कोणतीही माहिती असल्यास त्वरित वन विभागाला कळवावी.










