Congress party sit-in protest Chandrapur
Congress party sit-in protest Chandrapur : चंद्रपूर ६ नोव्हेम्बर (News३४) – आज दि ६ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता महानगरपालिके समोर गांधी चौक चंद्रपुर येथे महाकाली प्रभाग 12 व भिवापुर प्रभाग 14 चे काँग्रेसच्या माजी नगरसेवक नंदू नागरकर व वसंत देशमुख, प्रवीण पडवेकर काँग्रेस विधानसभा उमेदवार, सुनीता लोढीया, माजी नगराध्यक्ष, यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून ठिय्या सत्याग्रह आंदोलन ला सुरवात केली.
आंदोलनाचे मुख्य पार्श्वभूमी अशी की महाकाली प्रभाग 12 व भिवापुर प्रभाग 14 या दोन्ही प्रभागाला व शहराला जोडनारा महत्वाचा पुल अतिवृष्टीमुळे 3 महिन्या आधी वाहून गेला, चंद्रपूर च्या आराध्य दैवत माता महाकाली च्या यात्रे करिता दर वर्षी अनेक भाविक मार्च व एप्रिल महिन्या मध्ये लाखोच्या संख्येत दर्शनास येतात त्या वेळी बागला चौक ते अंचलेश्वर गेट हा मुख्य मार्ग बंद असतो त्या वेळी शहरातील नागरिक या पुलावरून मोठ्या संखेत प्रवास करतात. Congress party sit-in protest Chandrapur
Also Read : चंद्रपुरात खंडणीखोर पत्रकारांच्या टोळीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
चंद्रपुर बेनार रेल्वे स्टेशन साठी जाणारे प्रवासी नागरिक मुख्यता या पुला चा वापर करतात, दैनंदिन या मार्गाने जाणारे महाकाली प्रभाग १२ व भिवापूर प्रभाग 14 नागरिक नदीतुन जाने येणे करीत आहे धोधो पावसाने नदीच्या वाढलेल्या प्रवाहात एखादा व्यक्ति वाहुन जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाहीं तसेच शासकीय रुग्णालय, शासकीय इंजिनीरिंग कॉलेज, राजीव गांधी इंजिनीरिंग कॉलेज, बाबुपेठ, भिवापूर, WCL लालपेठ व बल्लारपूर करीत हा जोड रास्ता असून विद्याथी, व्यापारी व कामगार या रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. (congress protest)
दोनवेळा वाहून गेला पुलाचा भाग
तात्पूरता बनविन्यात येत असलेला रस्ता हा 2 दा वहुन गेला आहे त्याला रिपेअर करून मजबूत काम होणे शक्य नाहीं कारण त्याची निव (BASE) कमजोर झालेली आहे. तरी भविष्याचा विचार करत इथे मोठ्या व मजबूत पुलाची निर्मिति करणे आवश्यक आहे. हनुमान खिडकी महाकाली प्रभाग क्र. १२ व भिवापूर प्रभाग क्र. १४ मधील झरपट नदीवरील पुलिया बांधकामा करीता खनिज निधीतुन ४ कोटी ५० लक्ष रुपये जिल्हा खनिज निधितुन उपलब्ध करुण देण्या करीता मा. जिल्हाधिकारी चंद्रपुर यांना राजुरा विधानसभेचे माजी आमदार व ग्रामीण काँग्रेस कमिटी चे जिल्हाध्यक्ष सुभाषभाऊ धोटे, प्रवीण पडवेकर, नंदु नागरकर , सुनीता लोढ़िया व वसंत देशमुख यानि 3 महिन्या अगोदर भेट घेतली असता त्यांनी सूचना केली की महानगर्पालिकेने इस्टिमेट चा प्रस्ताव मंजूर करूण पाठवावे.
Also Read : बल्लारपुरातील संयुक्त गुन्हेगारीवर लगाम, पोलिसांनी लावला मकोका
आम्ही तत्कालीन आयुक्त विपिन पालीवाल साहेब याना भेटून विनंती केली त्यनि इस्टिमेट बनवून प्रस्ताव तयार केला परंतु मा. आयुक्त साहेब लांब रजेवर गेले व त्यांची बदली झाल्या मुळे हा प्रस्ताव मॅडम विद्या गायकवाड आयुक्त मनपा चंद्रपुर यानि दि 29/09/2025 ला जिल्हाधिकारी कार्यालय कड़े प्रस्ताव प्रशासकीय मान्यता करीता पठविला तरी हा प्रस्ताव मंजूर करुण ४ कोटी ५० लक्ष रुपये जिल्हा खनिज निधितुन उपलब्ध करुण द्यावा ही विनती केली तसेच शहर व जिल्हा प्रशासनाने योग्य दखल न घेतल्यास काँग्रेस पक्षाच्या नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ता व सामान्य नागरिकांसोबत मिळून तीव्र आंदोलन करण्याचे संकेत देत चंदन पाटिल अतिरिक्त आयुक्त मनपा चंद्रपुर व संदीप चिद्दरवार उपायुक्त मनपा चंद्रपुर यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन निवेदन स्वीकारले. mahakali bridge collapse
आंदोलकांनी हा विषय मा आमदार किशोर जोर्गेवर चंद्रपुर विधानसभा क्षेत्र यांनी जातीने लक्ष न घातल्यास महाकाली प्रभाग 12 व भिवापुर प्रभाग 14 चे नागरिक निषेध करतील. या प्रसंगी आंदोलनात विनायक बांगडे, माजी अध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमेटी, डॉ सुरेश महाकुलकर विरोधी पक्ष नेते मनपा चंद्रपुर, प्रशांत दानव, अजय वैरागडे, ज्ञानेश्वर जुनघरे, संगीत भोयर, अमजद आली इराणी, सकीना अन्सारी, विना खनके, निलेश खोब्रागडे, केशव रामटेके, फारुख सिद्धीकी, शालिनी भगत, रमीज शेख, सतीश मालेकर, राजू बनकर, परब गिरडकर, विनोद संकत, कुणाल रामटेके, मंगला मडावी, प्रकाश चंदनखेडे, रेहमत शेख, local congress leaders protest bridge issue
सर्जील भाई, राजा काझी, राजू दास, निखिल देव, प्रमोद विश्वकर्मा, कुमार स्वामी पोत्तलवार, अशोक उईके, जावेद भाई, बंडू जांगडे, राजू गर्गेलवार, डॉ जेणेकर मेहबूब भाई, शकीला दीदी, दीपक काटकोजवार, राजेश रंगारी, बंडोपंथ तातावार, सचिन गावंडे, राकेश चहारे, सचिन क्षीरसागर, सचिन चहारे, जफर बेग विजय ठोंबरे, मोहन डोंगरे, सचिन गोरे सुरेश आत्राम, विजय पराते, निखिल पाटिल, हरी गावंडे, भाणेश जंगम, सुरेश आत्राम, पांडुरंग गावतुरे, मोरेश्वर शेंडे, घनशाम वासेकर, श्याम राजूरकर, प्रकाश अधिकारी, सौ शोभा ज्ञानेश्वर जुनघरे, अनिल तपासे, जय झाडे, प्रकाश चहारे, गुडू बेग आदि प्रभागचे नागरिक मोठ्या संखेत उपस्थित होते. Congress party sit-in protest Chandrapur










