Sunday market shutdown due to mahatet exam । MAHATET 2025 मुळे चंद्रपुरातील संडे मार्केटला ‘ब्रेक’; हजारो विद्यार्थ्यांची गर्दी अपेक्षित

Sunday market shutdown due to mahatet exam

Sunday market shutdown due to mahatet exam : चंद्रपूर १८ नोव्हेंबर (News३४) – येत्या २३ नोव्हेंबर रोजी संडे मार्केट भरणाऱ्या परिसरातील विविध शाळांमध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा २०२५ होणार असल्याने दर रविवारला भरणारे संडे मार्केट या दिवशी बंद ठेवण्यात येणार असुन सदर निर्देशाची सर्व व्यावसायिकांनी नोंद घेण्याचे आवाहन चंद्रपूर मनपा प्रशासनाने केले आहे.  

Read Also : चंद्रपुरातील रयतवारी मध्ये आमदार जोरगेवार व माजी नगरसेवक अडूर यांची शाब्दिक चकमक

मनपा हद्दीतील जयंत टॉकीज चौक ते खिश्चन कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत दर रविवार ला संडे मार्केट या नांवाने बाजार भरत असून, त्यांत विविध तात्पुरत्या स्वरुपाची दुकाने, हातठेले, फेरीवाल्यांची दुकाने लावण्यांत येत असतात. येत्या रविवारी दिनांक २३ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा २०२५ (MAHATET) होणार आहे.

  सदर परीक्षेची केंद्रे या परिसरातील न्यु इंग्लीश हायस्कुल, ज्युबली हायस्कुल व मराठी सिटी/हिंदी सिटी हायस्कुल येथे देण्यात आली असल्याने येथे मोठया प्रमाणात विद्यार्थी येणार आहे. तसेच सदरील परिसरात नागरिकांची प्रचंड गर्दी असण्याची शक्यता असतांना संडे मार्केट मधील गर्दीमुळे काही दुर्घटना होण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही. त्यामुळे सदर ठिकाणी दर रविवारला भरणारे संडे मार्केट बंद ठेवण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. 

Leave a Comment