घुग्घुस नगर परिषदेच्या निवडणुकीला स्थगिती
why municipal elections postponed in chandrapur : चंद्रपूर, दि. 30 नोव्हेम्बर (News३४) : राज्य निवडणूक आयोगाच्या 4 नोव्हेंबर 2025 च्या पत्रान्वये चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, भद्रावती, वरोरा, ब्रम्हपुरी, मूल, घुग्घुस, गडचांदूर, चिमूर, राजूरा, नागभीड या नगर परिषदांच्या व भिसी नगर पंचायतीच्या सदस्य व अध्यक्ष पदासाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता.
मानव वन्यजीव संघर्ष : वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार
परंतु ज्या नगर परिषदा आणि नगर पंचायतीमध्ये ज्या जागेसाठी अपील दाखल होते, मात्र अपिलाचा निकाल संबंधित जिल्हा न्यायालयाकडून 22 नोव्हेंबर 2025 नंतर म्हणजेच 23 नोव्हेंबर 2025 किंवा त्यानंतर देण्यात आला आहे, अशा नगर परिषदा व नगर पंचायतीच्या सदस्य पदाच्या त्या जागेच्या निवडणुका 4 नोव्हेंबर 2025 रोजीच्या निवडणूक कार्यक्रमानुसार घेण्यात येऊ नयेत. तसेच अशा प्रकरणात अध्यक्ष पदाचा समावेश असल्यास त्या संपूर्ण नगर परिषदेची निवडणूक स्थगित करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने 29 नोव्हेंबर 2025 रोजी आदेशान्वये निर्देशित केले आहे.
उमेदवारांचा हिरमोड
प्रशासन व न्यायालयाच्या या आदेशाने भावी नगरसेवकांचा चांगलाच हिरमोड झाला आहे, मागील आठवडाभरापासून प्रचारात शक्ती लावत सामान्य मतदारांपर्यंत पोहचण्याचे प्रयत्न करण्यात आले मात्र २ दिवसांनी होणार मतदान पुढे ढकलल्याने उमेदवारांना चांगलाच धक्का बसला आहे.
या काळात राष्ट्रीय पक्ष कांग्रेस, भाजप, शिवसेना दोन्ही व राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष दोन्ही यांचे स्टारप्रचारकांनी सभा घेतल्या होत्या, सभेसाठी लागलेला खर्च व पुढे होणारा खर्च यामुळे उमेदवार यांचं बजेट बिघडले आहे, सदर निवडणूक हि डिसेम्बर महिन्याच्या २० तारखेला होण्याची शक्यता आहे. why municipal elections postponed in chandrapur
त्या अनुषंगाने घुग्गुस नगर परिषदेचे अध्यक्षपद व सात सदस्य जागा तसेच गडचांदूर न.प. ची जागा क्र. 8 – ब (सर्वसाधारण महिला), मूल न.प.ची जागा क्र. 10 – ब (सर्वसाधारण), बल्लारपूर न.प. ची जागा क्र. 9 – अ (ना.मा. प्र.) आणि वरोरा नगर परिषदेची जागा क्र. 7 – ब (सर्वसाधारण) या निवडणुका संदर्भात महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक नियम 1966 च्या नियम 17 (1)(ब) नुसार कार्यवाही न झाल्याने घुगुस नगर परिषदेचा संपूर्ण निवडणूक कार्यक्रम तसेच गडचांदूर न.प. ची जागा क्र. 8 – ब (सर्वसाधारण महिला),
मूल न.प.ची जागा क्र. 10 – ब (सर्वसाधारण), बल्लारपूर न.प. ची जागा क्र. 9 – अ (ना.मा. प्र.) आणि वरोरा नगर परिषदेची जागा क्र. 7 – ब (सर्वसाधारण) या जागेकरीता सदस्य पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रमाला सुध्दा स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने 29 नोव्हेंबर 2025 रोजीच्या आदेशानुसार घुग्घुस नगर परिषदेचा तर गडचांदूर, मूल, बल्लारपूर आणि वरोरा येथील वरील नमुद सदस्य निवडणुकीचा सुधारीत कार्यक्रम जाहीर केला असल्याचे जिल्हा निवडणूक कार्यालयाने कळविले आहे.










