चंद्रपूर मनपा निवडणूक: आम आदमी पार्टीच्या १० उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Aap Election Candidate List : चंद्रपूर २६ डिसेंबर २०२५ (Author प्रकाश हांडे) – १५ जानेवारी रोजी होणाऱ्या चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने १० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मागील अनेक वर्षांपासून जनतेच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या आम आदमी पक्षाने यंदा पालिका निवडणुकीच्या मैदानात उडी मारली असून सुशिक्षित उमेदवारांना पक्षाने संधी दिली आहे. (नायलॉन मांजा विक्रेत्यांवर अडीच लाखांचा दंड)

आप चे महाराष्ट्र सहसचिव सुनील मुसळे यांनी १० उमेदवारांची नावे जाहीर केली असून यामध्ये प्रभाग क्र.८ (ब) वडगाव मधून आप चे जिल्हा संयोजक मयूर राईकवार, (बाबुपेठ प्रभाग 13 ड ) युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, प्रभाग क्र.१ (ड) दे.गो.तुकूम मधून योगेश गोखरे, (प्रभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रभाग क्रमांक 17 अ) जयदेव देवगडे, प्रभाग क्र.३ (क) एम.ई. एल. पुस्तकला संतोष बोपचे, विठ्ठल मंदिर प्रभाग क्र.१५ ब गट सुनिल रत्नाकर भोयर, प्रभाग क्र.११  (क) भानापेठ तबस्सूम शेख, प्रभाग क्र.१० (अ) एकोरी मंदिर विनोद नगराळे, प्रभाग क्र.७ (ड) जटपुरा सुनील सदभय्या, प्रभाग क्रमांक १ देगो तुकूम ब गटातून प्रभाकर आवारी यांचा समावेश आहे.

चंद्रपूर महानगरपालिका मधील नागरिकांच्या समस्येवर एकमात्र आम आदमी पार्टी लढत आहे, सत्ताधारी यांच्या विरोधात आप नेहमी उभी राहली आहे, मात्र यंदा आप च्या उमेदवारांना जनतेचा मतरूपी आशीर्वाद हवा आहे, जर आप चे उमेदवार यांनी मनपा निवडणुकीत विजय मिळविला तर नागरिकांची विकासाच्या ४ गॅरंटी नुसार कामे होणार हे नक्की.

पुढील २ दिवसात आप चे उमेदवारांची यादी जाहीर होणार अशी शक्यता आहे, नागरिकांच्या मूलभूत समस्यांवर आम आदमी पार्टी लढत असून मतदारांनी त्यांना सहकार्य करावे असे आवाहन सुनील मुसळे यांनी केले आहे.

Leave a Comment