BJP Shiv Sena Seat Sharing : चंद्रपूर २६ डिसेंबर २०२५ (Author प्रकाश हांडे) – चंद्रपूर व राज्यातील इतर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना व भाजपच्या युतीची घोषणा झाली आहे, चंद्रपूरात भाजप व शिवसेना समन्व्य समिती गठीत करण्यात आली आहे. असे पत्र भाजप प्रदेश अध्यक्षाच्या वतीने जारी करण्यात आले आहे, मात्र या युतीचा फायदा कुणाला होणार? हे निवडणूक निकालानंतर कळेलचं.
शिवसेना व भाजपच्या समन्व्य समितीमध्ये भाजप पक्षातर्फे माजी खासदार हंसराज अहिर, आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, भाजप महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार व माजी भाजप अध्यक्ष राहुल पावडे यांचा समावेश आहे, तर शिवसेना पक्षातर्फे दीपक सावंत, आशिष जयस्वाल, किरण पांडव व युवराज धानोरकर यांचा समावेश आहे.
नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकीत भाजप व शिवसेनेची कामगिरी जवळपास सारखीच होती, भाजप ने १ नगरपरिषद व १ नगरपंचायत तर शिवसेना ने १ नगरपरिषदेवर सत्ता मिळवली, मात्र नगरसेवकांची संख्या भाजपची मोठी आहे. शिवसेनेने वरोरा व भद्रावती नगरपरिषद निवडणुकीत सर्वात जास्त लक्ष दिले होते. काही ठिकाणी तर सेनेचे पदाधिकारी यांनी सभाही घेतल्या नाही. त्यामुळे जे नगरसेवक निवडून आले ते स्वबळावर. मात्र भाजपने शिस्तबद्ध पद्धतीने निवडणुक लढली पण नेत्यांमध्ये आपसात समन्व्य नसल्याने भाजपचा पराभव झाला. BJP Shiv Sena Seat Sharing
महानगर अध्यक्षांचे नेतृत्व
चंद्रपूर महानगरात भाजपचे वर्चस्व असले तरी शिवसेना सोबतीला आली तर चित्र बदलणार असे नाही, कारण शिवसेना सत्तेत आहे मात्र त्यांच्या पदाधिकारी यांनी पक्ष संघटनेकडे फारसे लक्ष दिले नाही, याउलट शिवसेना ठाकरे या पक्षाची चंद्रपुरात चांगली स्थिती आहे. चंद्रपूर महानगर पालिका निवडणुकीत पक्ष फुटी अगोदर शिवसेनेच्या केवळ २ जागा होत्या, आता राजकारणाची परिस्थिती बदलल्याने यंदा च्या निवडणुकीत परिस्थिती वेगळी असल्याने शिवसेनेला चांगला संघर्ष संघर्ष करावा लागेल असे चित्र आहे. भाजप महानगर अध्यक्ष सुभाष कसनगोट्टूवार व शिवसेना महानगर अध्यक्ष भरत गुप्ता यांच्या नेतृत्वात हि पहिलीच निवडणूक असल्याने दोघात धुरंधर कोण याची समीक्षा निवडणूक निकालानंतर ठरेलचं.
यंदा भाजपकडे इच्छुक उमेदवारांची मोठी फौज आहे, या वाटाघाटीत शिवसेनेला किती जागेवर समाधान मानावे लागेल हे २८ डिसेंबर रोजी कळेलच. सध्या शिवसेना पक्षातर्फे अनेकांनी प्रभागात मोर्चेबांधणी सुरु केली आहे. या मोर्चेबांधणीत शिवसेना महिला शहर प्रमुख वाणी सादलावार सध्या पुढे आहे.
