चंद्रपूर शहरात घरफोडीची मालिका! कायद्याचे तीनतेरा

चंद्रपूर शहरात घरफोडीची मालिका! कायद्याचे तीनतेरा

Chandrapur burglary incident : चंद्रपूर ११ डिसेंबर २०२५ (News३४) – चंद्रपूर शहरातील विविध भागात घरफोडीच्या घटनेत वाढ होत असून शहरात कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजलेले दिसत आहे. शहरातील जटपुरा भागात एकाचवेळी दोन ठिकाणी घरफोडी झाल्या, यानंतर रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नगिनाबाग मध्ये ९ डिसेंबर रोजी घरफोडीची घटना उघडकीस आली यामध्ये लाखोंच्या मुद्देमालावर अज्ञाताने हात साफ केला आहे.

३३ वर्षीय मयूर खोब्रागडे यांच्या सिस्टर कॉलोनी, नगिनाबाग येथील घरी घरफोडी झाली, ज्यावेळी हि घटना घडली तेव्हा घरी कुणी नव्हते. मयूर खोब्रागडे हे नागपुरात नोकरी करीत असून सध्या ते नागपुरात राहतात, त्यांच्या चंद्रपुरातील घरी आई व भाऊ सह वहिनी राहते. (हे वाचा – जटपुरा गेट भागात एकाच दिवशी दोन घरफोड्या)

७ डिसेंबर ला मयूर यांचा भाऊ अश्रूत हा घराला कुलूप लावून नागपूरला गेला होता, तेव्हापासून तो नागपुरात होता, ९ डिसेंबर रोजी शेजारी यांचा कॉल आला कि मुख्य दारावरील कोयंडा तुटलेल्या अवस्थेत आहे अशी माहिती दिली. Chandrapur burglary incident

आपल्या घरी चोरी झाली असा अंदाज व्यक्त करीत मयूर चंद्रपूरला कुटुंबासह आले असता, घरातील सामान अस्तव्यस्त पडलेले होते, बेडरूम मधील कपाट बघितले असता त्यामधील सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण २ लक्ष १३ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला.

७ डिसेंबर ते ९ डिसेंबर दरम्यान अज्ञाताने घरी कुणी नसल्याचा फायदा घेत दरवाजाचा कोयंडा तोडून घरी प्रवेश करीत चोरी केली. याबाबत मयूर यांनी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञात आरोपीवर कलम ३०५, ३३१ (२) व ३३१ (४) अनव्ये गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment