Chandrapur crime breaking news : चंद्रपूर १९ डिसेंबर २०२५ (News३४) – चंद्रपूर शहरात अनेक दिवसापासून घरफोडीचे गुन्हे घडत आहे, या गुन्ह्यांची उकल करीत असताना रामनगर पोलिसांना बंद घराची रेकी करून घरफोडी करणारा आरोपी पोलिसांच्या हाती लागला असून आरोपीजवळून तब्बल १९ लक्ष ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरी व घरफोडीचे वाढते गुन्हे बघता त्याबाबत गुन्हे शोध पथकाने खबरी नेटवर्क सक्रिय करीत परराज्यातील आरोपीला अटक केली. सदर आरोपी हा चोरीचा मुद्देमाल विक्री साठी जात असताना पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
४३ वर्षीय मुस्तकिन मो. शौकीन चौधरी राहणार समर गार्डन मेरठ, उत्तरप्रदेश हल्ली मुक्काम नेहरू शाळेच्या मागे घुटकाला वॉर्ड, आरोपीकडून सोन्या-चांदीचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली चारचाकी एकूण १९ लक्ष ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी मुस्तकिन हा चंद्रपुरात घराची दारे व खिडक्या बसविणे व दुरुस्तीचे काम करण्याच्या बहाण्याने शहरातील बंद असलेल्या घराची रेकी करीत थेट चारचाकीने रात्रीच्या वेळी चोरी करायचा. आरोपीने यापूर्वी २ घरफोडीचे गुन्हे दाखल आहे. Chandrapur crime breaking news
सदरची यशस्वी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनात रामनगर पोलीस निरीक्षक आसिफरजा शेख यांच्या नेतृत्वात सपोनि देवाजी नरोटे, हनुमान उगले, निलेश वाघमारे, पोलीस कर्मचारी लालू यादव, शरद कुडे, आनंद खरात, बाबा नैताम, रामप्रसाद नैताम, जितेंद्र आकरे, मनीषा मोरे, पंकज ठोंबरे, रवीकुमार ढेंगळे, संदीप कामडी, प्रफुल पुप्पलवार, सुरेश कोरवार, ब्ल्यूटी साखरे व पंकज पोंदे यांनी केली.
