Chandrapur MVA Seat Sharing : चंद्रपूर २५ डिसेंबर २०२५ (Author प्रकाश हांडे) – चंद्रपूर महानगरपालिका निवडणूकीचे नामनिर्देशन अर्ज भरण्यासाठी काही दिवस शिल्लक असताना सुद्धा चंद्रपुरात महाविकास आघाडीचे जागावाटपाबाबत संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकीत भव्य यश मिळाल्यावर कांग्रेस पक्ष अति-आत्मविश्वासात आला कि काय अशी स्थिती सध्या चंद्रपुरातील राजकारणात निर्माण झाली आहे. (इंजिनीअर बनला किडनी विक्री करणारा दलाल)
नगर परिषद निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले, काहींना आपली ताकद दाखविता आली तर काही पक्ष अपयशी ठरले आहे, चंद्रपूर मनपा निवडणुकीत सुद्धा हीच परिस्थिती आहे, जागावाटप होण्यापूर्वीच अनेकांनी स्वतःला उमेदवार घोषित करीत प्रचाराला सुरुवात केली आहे.
अश्यातच शिवसेना व राष्ट्रवादी कांग्रेसला अजूनही अधिकृत जागावाटप बाबत बैठकीचे निमंत्र मिळाले नाही, मात्र चंद्रपूर कांग्रेसने मनपातील सर्वच जागेवर लढण्याची तयारी दर्शवित इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतलेल्या आहे. याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे म्हणाले कि अजूनही आम्हाला कांग्रेस तर्फे जागावाटप बाबत अधिकृत बोलणी झाली नाही, राष्ट्रवादी कांग्रेस शहर जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांनी सुद्धा जागावाटप बाबत बोलणी झाली नसल्याचे सांगितले. Chandrapur MVA Seat Sharing
महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी कांग्रेस पक्षाला ६६ जागेपैकी १५-१५ जागेची मागणी करणार असल्याचे सांगितले असले तर अद्यापही कांग्रेस पक्षाचे जागावाटप बाबत एकमत झालेले नाही, याबाबत कांग्रेस महानगर अध्यक्ष संतोष लहामगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्या मोबाईल मधील फक्त रिंग वाजत होती, त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही.
विशेष बाब म्हणजे महाविकास आघाडी मधील जुन्या घटकपक्षांशी अंतर राखत नव्याने आघाडी मध्ये सामील झालेल्या वंचित आघाडी सोबत कांग्रेस जवळीक साधत आहे. सन्मानपूर्व जागा मिळाल्या नाहीतर आम्ही मनपा निवडणूक स्वबळावर लढू असा इशारा शिवसेना व राष्ट्रवादी कांग्रेस ने दिला आहे.
जागावाटप बाबत ची हि परिस्थिती भाजपात सुद्धा निर्माण झाली असून महानगराच्या राजकारणात मुनगंटीवार-जोरगेवार यांनी आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आपसात शीतयुद्ध सुरु केले आहे. कांग्रेसचा अतिआत्मविश्वास व भाजपातील अंतर्गत युद्ध येणाऱ्या काळात मतदार मतरूपी निकाल देईलचं.
