Election Nomination Deadline : चंद्रपूर २७ डिसेंबर २०२५ (Author प्रकाश हांडे) – चंद्रपुर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी नामनिर्देशन दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी ४६३ नामनिर्देशन पत्रांची उचल करण्यात आली असुन एकही अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. (चंद्रपूर मनपा निवडणूक आपची पहिली यादी जाहीर)
मनपा सार्वत्रिक निवडणूकीसाठी नामनिर्देशन दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची ५ कार्यालये मिळुन एकुण २०२ इच्छूकांनी ४६३ नामनिर्देशन पत्रांची उचल केली. नामनिर्देशन पत्रे ही केवळ प्रत्यक्षरित्याच (ऑफलाईन) सादर करता येत आहेत. ३० डिसेंबर २०२५ (मंगळवार) हा नामनिर्देशन दाखल करण्याचा शेवटचा दिवस राहणार आहे.
२३ डिसेंबर ते २९ डिसेंबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत तर ३० डिसेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या कालावधीत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे.रविवार २८ डिसेंबर रोजी नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार नाही.
केंद्रनिहाय अर्जाची संख्या पुढीलप्रमाणे –
१.निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक १ – (प्रभाग क्र. १,२ व ५) ४१ इच्छुकांद्वारे ८८ अर्जांची उचल
२.निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक २ -(प्रभाग क्र. ३,४ व ६) – ३४ इच्छुकांद्वारे ८४ अर्जांची उचल
३.निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक ३ – (प्रभाग क्र. ७,८ व ९) – २४ इच्छुकांद्वारे ६५ अर्जांची उचल
४.निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक ४ – (प्रभाग क्र. १०,११,१२ व १५) – ४७ इच्छुकांद्वारे १०४ अर्जांची उचल
५.निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक ५ – ( प्रभाग क्र. १३,१४,१६ व १७) – ५६ इच्छुकांद्वारे १२२ अर्जांची उचल
