Election Nomination Process : चंद्रपूर २३ डिसेंबर – चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी नामनिर्देशन भरण्याची प्रक्रिया २३ डिसेंबर २०२५ (मंगळवार) पासुन सुरु होत असुन ३० डिसेंबर २०२५ (मंगळवार) हा नामनिर्देशन दाखल करण्याचा शेवटचा दिवस राहणार आहे. २३ डिसेंबर ते २९ डिसेंबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत तर ३० डिसेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या कालावधीत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे. (आमदार जोरगेवार यांच्या पत्रावरून सुरु झालं राजकीय महाभारत)
२५ डिसेंबर रोजी ख्रिसमस व २८ डिसेंबर (रविवार) या सुटीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रांचा स्वीकार करण्यात येणार नाही. नामनिर्देशपत्रे प्रत्यक्षरित्या (ऑफलाईन) सादर करावयाची असुन प्रक्रियेसाठी ५ निवडणूक निर्णय अधिकारी व त्यांना सहाय्यक म्हणुन १५ सहायक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.निवडणूक निर्णय अधिकारी यांची ५ कार्यालये निश्चित करण्यात आली असुन या केंद्रांवर प्रभागनिहाय नामनिर्देशन पत्रे दाखल करता येणार आहे. Election Nomination Process
या केंद्रांवर दाखल करता येईल नामनिर्देशन पत्रे –
१. निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक १ – आत्मा प्रशिक्षण सभागृह,कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा) कृषी चिकीत्सालय यंत्रणा व रोपवाटीका परिसर, सिव्हील लाईन, चंद्रपूर, (प्रभाग क्र. १,२ व ५)
२. निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक २ – मनपा सभागृह, एम.बी.शाळेजवळ, कृष्णनगर,मुल रोड, चंद्रपूर
(प्रभाग क्र. ३,४ व ६)
३. निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक ३ – मनपा झोन क्र. 1 चे कार्यालय, संजय गांधी मार्केट, पहिला माळा, नागपूर रोड, चंद्रपूर, (प्रभाग क्र. ७,८ व ९)
४. निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक ४ – मनपा झोन क्र. 2 चे कार्यालय, सात मजली इमारत, पहिला मजला, गांधी चौक, चंद्रपूर. (प्रभाग क्र. १०,११,१२ व १५)
५. निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक ५ – मनपा नवीन अभ्यासिका,महादेव मंदिरासमोर, बाबुपेठ, चंद्रपूर
( प्रभाग क्र. १३,१४,१६ व १७)
