evm machine vandalized in gadchandur polling । चंद्रपूर निवडणूक LIVE: गडचांदूरमध्ये संतप्त मतदारांनी ईव्हीएम मशीन फोडली

evm machine vandalized in gadchandur polling । चंद्रपूर निवडणूक LIVE: गडचांदूरमध्ये संतप्त मतदारांनी ईव्हीएम मशीन फोडली

evm machine vandalized in gadchandur polling : कोरपना/गडचांदूर: चंद्रपूर जिल्ह्यातील ९ नगरपालिका आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकीदरम्यान दिवसभर विविध केंद्रांवर गोंधळाचे वातावरण होते. कुठे तांत्रिक बिघाडामुळे मतदान थांबले, तर कुठे मतदारांना पैसे वाटपाचे प्रकार उघडकीस आले. या सगळ्या गोंधळात गडचांदूर येथे एक अत्यंत गंभीर घटना घडली, जिथे एका संतप्त मतदाराने ईव्हीएम मशीन फोडून टाकली.

पोलीस आदेश : चंद्रपूर जिल्ह्यात कलम ३६ लागू

ही घटना गडचांदूर नगरपरिषदेच्या प्रभाग ९ मधील आदर्श हिंदी विद्यालय (केंद्र क्रमांक २) येथे घडली. राम मल्लेश दुर्गे (वय ४०) नावाच्या मतदाराने मतदान करताना ‘नगारा’ चिन्हाचे बटन दाबले असता, अचानक भाजपच्या ‘कमळ’ चिन्हाचा दिवा लागला, असा गंभीर आरोप त्यांनी केला. या कथित प्रकारामुळे संतापाच्या भरात दुर्गे यांनी ईव्हीएम मशीनवर हल्ला करत ती फोडून टाकली.

घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच मतदान केंद्राबाहेर मोठ्या संख्येने मतदारांनी गर्दी केली आणि संतप्त नागरिकांनी **“भाजप मुर्दाबाद”**च्या जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यामुळे काही काळ मतदान प्रक्रियेला ब्रेक बसला आणि वातावरण अत्यंत तणावपूर्ण बनले. evm machine vandalized in gadchandur polling

परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव, मुख्याधिकारी आशिष चव्हाण आणि ठाणेदार शिवाजी कदम यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नागरिकांशी संवाद साधून मध्यस्थी केली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी तात्काळ ईव्हीएम मशीनचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, या घटनेची सखोल चौकशी केली जात आहे.

या घटनेमुळे गडचांदूरमधील राजकीय तापमान अधिक वाढले असून, मतदान केंद्राबाहेर अजूनही तणाव असल्याने सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.

युवकाला अटक

गडचांदूर नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान वॉर्ड क्रमांक 9 येथील मतदान केंद्र 9/2 येथे मतदान यंत्रासोबत छेडछाड करणाऱ्या युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. जिल्हा प्रशासनाने याची तात्काळ दखल घेत क्षतीग्रस्त बॅलेट युनीट बदलवून मतदान सुरळीत सुरू केले. विशेष म्हणजे यावेळी कंट्रोल युनीट पुर्णपणे सुरक्षित होते.

विवेक मल्लेश दुर्गे हा गडचांदूर येथील रहिवासी असून आज गडचंदुर येथील मतदान केंद्र क्रमांक 9/2 येथे मतदान करताना त्याने बॅलेट युनिट ला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मतदान केंद्रावर उपस्थित पोलिसांनी त्याला त्वरीत अटक केली. जिल्हा प्रशासनाच्या तत्परतेने सदर मतदान केंद्रावर पुन्हा सुरळीत मतदान सुरू झाले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment