जिल्हाधिकारी गौडा यांनी केली ईव्हीएम स्ट्रॉंग रूमची पाहणी

जिल्हाधिकारी गौडा यांनी केली ईव्हीएम स्ट्रॉंग रूमची पाहणी

EVM security guidelines : चंद्रपूर, दि. ०५ डिसेंबर (News३४) : नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी चंद्रपूर  विनय गौडा जी. सी. यांनी आज वरोरा तालुक्यात विविध कार्यांचा आढावा घेत क्षेत्रदौरा केला. सुरवातीला त्यांनी वरोरा येथील मतमोजणीसाठी ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनच्या स्ट्रॉंग रूमची पाहणी करून  सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आणि ईव्हीएम सुरक्षेसंदर्भात आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मौजे शेगाव बुद्रुक येथील झुडपी जंगल गट क्रमांक 1 ची पाहणी केली. सदर जमीन डी-लिस्टिंगसाठीचा प्रस्ताव वन विभागास पाठविण्याची प्रक्रिया महसूल विभागाने गतिमान करावी, असे निर्देश त्यांनी महसूल अधिकाऱ्यांना दिले. यानंतर चारगाव बुद्रुक येथील प्रगतशील शेतकरी  मधुकर भलमे यांच्या तूर उत्पादन व बियाणे उत्पादन शेताला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. (हे हि वाचा : ताडोबा अभयारण्यात नियमांचे उल्लंघन)

शेतकऱ्यांना मार्गदर्शन

तेलबिया उत्पादन वाढीसाठी नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब, प्रयोगशील शेती आणि नाविन्यपूर्ण पद्धतींना प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असे सांगून कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्याचे निर्देश त्यांनी उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांना दिले. EVM security guidelines

या दौऱ्यात उपविभागीय अधिकारी  संदीप भस्के, तहसीलदार योगेश कौटकर, पोलीस निरीक्षक श्री. तांबाडे, उपविभागीय कृषी अधिकारी कविता हरिणखेडे, मुख्याधिकारी नगरपरिषद वरोरा श्री. मेश्राम, तालुका कृषी अधिकारी श्री. राठोड, महसूल मंडळ अधिकारी अजय निखाडे यांसह तलाठी व कृषी सहाय्यक उपस्थित होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment