Jatpura Gate Prabhag : चंद्रपूर २२ डिसेंबर २०२५ (News३४ प्रकाश हांडे) – नुकत्याच नगरपरिषद निवडणूक संपन्न झाली या निवडणुकीत भाजपच्या दिग्गज नेत्यांना कांग्रेस पक्षाने पराभवाची धूळ चारल्याने आगामी चंद्रपूर मनपा निवडणुकीत भाजपची धाकधूक वाढली आहे. मात्र या धाकधुकीला न घाबरता भाजपच्या छबूताई वैरागडे या मनपा निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याची तयारी करीत आहे. (मनपा निवडणूक उमेदवारांसाठी खुशखबर, पोलिसांनी सुरु केला विशेष सेल)
वर्ष २०१७ मध्ये जटपुरा प्रभाग क्रमांक ७ मधून छबू वैरागडे यांनी पहिल्यांदा मनपा निवडणुकीत उडी मारली होती, त्यांनी त्यावेळी ३ हजार २० मते घेत विजय मिळविला. प्रतिद्वंदी कांग्रेसच्या कोकिला पोटदुखे यांचा ८०७ मतांनी पराभव केला होता. पोटदुखे यांना २ हजार २१३ मते मिळाली होती.
विजयाची माळ गळ्यात पडल्यावर छबू वैरागडे यांनी प्रभागात विकासकामांचा झपाटा सुरु केला, नागरिकांच्या सुख-दुःखात त्या सहभागी झाल्या, नागरिकांच्या एका हाकेला धावत त्यांनी प्रत्येक कामात सरशी केली. वर्ष २०२२ मध्ये मनपाचा कार्यकाळ संपला, मनपामध्ये प्रशासक राज सुरु झाले त्यानंतर त्यांनी नगरसेवक नसताना सुद्धा नागरिकांचे कामे केली. Jatpura Gate Prabhag
कोरोना काळात असंख्य नागरिकांच्या मदतीला वैरागडे धावल्या, शासनाच्या योजनांचा लाभ नागरिकांना मिळावा यासाठी त्यांनी नेहमी प्रयत्न केला. आजही वैरागडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात नागरिकांची चांगलीच गर्दी जमलेली असते. ८ वर्षांपासून वैरागडे ह्या प्रभागातील नागरिकांच्या संपर्कात असून त्यांचं नाव जनसामान्य नागरिकांसाठी नवीन नाही. ८ वर्षांनी निवडणूका जाहीर झाल्या आहे. त्यांनी प्रभागात केलेली कामे याच्या भरोवश्यावर त्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे. सर्वसाधारण महिला गटातून त्यांनी आपली दावेदारी पक्षाकडे सादर केली आहे.
छबू वैरागडे यांनी तेली समाज, उत्कृष्ट महिला मंच व अनेक बचत गटाच्या माध्यमातून महिलांसाठी अनेक समाजपयोगी कार्य केले आहे.
