सुगंधित तंबाखू माफियांवर थेट मकोका! फडणवीसांची अधिवेशनात घोषणा

सुगंधित तंबाखू माफियांवर थेट मकोका! फडणवीसांची अधिवेशनात घोषणा

MCOCA on gutkha trade : चंद्रपूर ९ डिसेंबर (News३४) – विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी व सत्ता पक्षातील आमदारांनी अंमली पदार्थ व सुगंधित तंबाखूवरून सरकारला चांगलंच घेरलं, इतर राज्यातून येणारे हे अंमली पदार्थाची वाहतूक थांबवायची असेल तर थेट मकोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी केली. या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरचं कायद्यात बदल करून अश्या माफियांवर मकोका लावण्याचे संबंधित विभागाला निर्देश दिले आहे असे सांगितले. (हे हि वाचा – ताडोब्याची वाघीण चालली सह्याद्रीला)

विधानसभेत गुटखा माफियांचा मुद्दा: विरोधकांचा हल्ला

वर्ष २०१२ पासून राज्यात सुगंधित तंबाखूवर प्रतिबंध असला तरी आज खुलेआम सर्रासपणे विक्री होत आहे. स्थानिक पातळीवरील प्रशासन या विक्रीवर डोळेझाक करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या बेकायदेशी वस्तूची उलाढाल आठवड्याला कोट्यवधी रुपयांची असते.

तंबाखू व्यापाऱ्यांवर मकोका

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विदर्भ सह मुंबई भागात होत असलेल्या सुगंधित तंबाखू व गुटखा विक्रीवर पूर्णतः प्रतिबंध करण्यात यावा व जे याचा व्यवसाय करतात त्यांच्यावर मकोका कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. MCOCA on gutkha trade

राज्यातील शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटरच्या आत सुद्धा गुटखा व खर्रा विक्रीची दुकाने मनपा, नगरपालिका द्वारे कारवाई करीत अतिक्रमण काढण्याच्या सूचना सुद्धा संबंधित विभागाला देण्यात आली असल्याची माहिती मंत्री पंकज भोयर यांनी दिली.

राज्यासह चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखूची सर्रासपणे विक्री होत आहे मात्र ऍन औषध प्रशासन झोपेचं सोंग घेऊन काम करीत आहे. सुगंधित तंबाखू व गुटख्यामुळे तरुण पिढी कॅन्सर च्या विळख्यात सापडली आहे. कधीकाळी प्रशासनाने सुगंधित तंबाखूचा माल पकडला तर आरोपीना जामीन मिळतो व ते पुन्हा त्याच कामात गुंततात.

कायदा कमकुवत असल्यामुळे आरोपी हा व्यवसाय वारंवार करतात त्यामुळे अश्या आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करावी. इतर राज्यातून होणारी वाहतूक थांबविता संबंधित व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल केले तरचं हा अवैध धंदा बंद होऊ शकतो.

मकोका लागणार

आमदारांच्या या प्रश्नांवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कि आम्ही यापूर्वी या गुन्ह्यात मकोका अंतर्गत कारवाई करू शकतो काय याबाबत सविस्तर चर्चाही झाली मात्र त्या कायद्यात सदर गुन्हा बसत नाही, त्यामुळे आम्ही कायद्यात बदल करण्याच्या सूचना विभागाला दिल्या असून या गुन्ह्यात आता मकोका कायद्यांतर्गत कारवाई होणार असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात दिले.

चंद्रपुरातील सुगंधित तंबाखूचे केंद्र

चंद्रपूर शहरात तुकूम, जटपुरा गेट, बिनबा गेट व बल्लारपूर आणि रयतवारी हे सुगंधित तंबाखू विकिरिचे मोठे केंद्र आहे, विशेष म्हणजे याबाबत सर्व माहिती पोलीस व अन्न व औषध प्रशासनाकडे उपलब्ध आहे, मात्र कारवाई करण्यात संबंधित विभाग डोळेझाक करतो.

Sharing Is Caring:

Leave a Comment