Municipal Election Expense Relief : चंद्रपूर १३ डिसेंबर २०२५ (News३४) : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केलेली निवडणूक खर्चाबाबतची महत्त्वपूर्ण मागणी पूर्ण झाली आहे. पुढे ढकलण्यात आलेल्या नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांनी नवीन वेळापत्रकानुसार निवडणूक चिन्हे वाटप झाल्यानंतरच (दिनांक ११ डिसेंबर रोजी) केलेला खर्च निवडणूक खर्च म्हणून ग्राह्य धरण्यात यावा. यापूर्वी केलेला सर्व खर्च ग्राह्य धरू नये, अशी स्पष्ट मागणी त्यांनी ५ डिसेंबर २०२५ रोजी पत्राद्वारे केली होती. त्यांच्या या पाठपुराव्यामुळे उमेदवारांवरील अतिरिक्त खर्चाचा ताण कमी झाला असून, निवडणुकीच्या खर्चाची मर्यादा वाढल्याने उमेदवारांनी समाधान व्यक्त केले आहे. Municipal Elections (हे हि वाचा – लोकसभेत प्रतिभा धानोरकरांचा प्रश्न आणि धक्कादायक वास्तव समोर)
या मागणीनुसार निवडणूक आयोगाने सकारात्मक कार्यवाही केली असून, उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी न्यायालयाच्या प्रक्रियेमुळे आणि आयोगाच्या आदेशामुळे निवडणुका पुढे ढकलल्या गेल्याने उमेदवारांवर अतिरिक्त खर्चाचा भार पडू नये, या उद्देशाने ही मागणी केली होती. Municipal Election Expense Relief
उमेदवारांना मोठा दिलासा
मा. उच्च न्यायालयाने देखील निवडणुकीच्या विलंबामुळे उमेदवारांच्या खर्चात झालेली वाढ मान्य करून, खर्चाची मर्यादा वाढवण्यासाठी मागणी केली होती, ज्यामुळे उमेदवारांच्या खर्चीक वाढीव मागणीला बळ मिळाले होते. या परिस्थितीत, चिन्हे वाटप झाल्यानंतरच झालेला खर्च ग्राह्य धरण्याचा निर्णय झाल्यामुळे, उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. Election Expenses
या निर्णयामुळे अनेक नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीतील उमेदवारांना दिलासा मिळणार आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी निवडणूक आयोगाला विनंती केली होती की, या महत्त्वाच्या बाबीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून, संबंधित जिल्हाधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी आणि उमेदवारांना या संदर्भात स्पष्ट आणि त्वरित मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात याव्यात. त्यांच्या या सकारात्मक पाठपुराव्यामुळे, निवडणुकीतील खर्चाबाबत उमेदवारांमध्ये असलेल्या अनिश्चिततेवर पडदा पडला आहे,व निवडणुकीतील खर्चाच्या संदर्भात मर्यादा वाढविण्यात येणार असल्याने आधी केलेल्या खर्चाच्या देखील समावेश होऊन निवडणूक लढविणे उमेदवारांना सोईचे होणार आहे. या निर्णयामुळे खासदार प्रतिभा धानोरकरांचे आभार मानून समाधान व्यक्त केले आहेत










