चंद्रपूर मनपा निवडणूक 2025-26: १९४ इच्छुकांनी घेतली ४१७ नामनिर्देशन पत्रे

No nominations filed : चंद्रपूर २३ डिसेंबर २०२५ (News३४ प्रकाश हांडे) – चंद्रपुर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी नामनिर्देशन दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकुण ४१७ नामनिर्देशन पत्रांची उचल करण्यात आली असुन एकही अर्ज दाखल करण्यात आलेला नाही.
   मंगळवार २३ डिसेंबर हा मनपा सार्वत्रिक निवडणूकीसाठी नामनिर्देशन दाखल करण्याचा पहिला दिवस होता. नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यास निवडणूक निर्णय अधिकारी यांची ५ कार्यालये निश्चित करण्यात आली आहेत. या ५ केंद्रांवर एकुण १९४ इच्छूकांनी ४१७ नामनिर्देशन पत्रांची उचल केली. 

  नामनिर्देशन पत्रे ही केवळ प्रत्यक्षरित्याच (ऑफलाईन) सादर करता येत आहेत. ३० डिसेंबर २०२५ (मंगळवार) हा नामनिर्देशन दाखल करण्याचा शेवटचा दिवस राहणार आहे. २३ डिसेंबर ते २९ डिसेंबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत तर ३० डिसेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या कालावधीत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे.  

केंद्रनिहाय अर्जाची संख्या पुढीलप्रमाणे

१.निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक १ – (प्रभाग क्र. १,२ व ५) – २५ इच्छुकांद्वारे ६१ अर्जांची उचल
२.निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक २ -(प्रभाग क्र. ३,४ व ६) – २५ इच्छुकांद्वारे ४७ अर्जांची उचल
३.निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक ३ – (प्रभाग क्र. ७,८ व ९) – ४८ इच्छुकांद्वारे ९७ अर्जांची उचल
४.निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक ४ – (प्रभाग क्र. १०,११,१२ व १५) –  ५३ इच्छुकांद्वारे १०८ अर्जांची उचल
५.निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक ५ – ( प्रभाग क्र. १३,१४,१६ व १७) – ४३ इच्छुकांद्वारे १०४ अर्जांची उचल 

Leave a Comment