नायलॉन मांजामुळे धोका वाढतोय; चंद्रपूर पोलिसांची विशेष मोहीम सुरू

नायलॉन मांजामुळे धोका वाढतोय; चंद्रपूर पोलिसांची विशेष मोहीम सुरू

police crackdown manjha : चंद्रपूर ११ डिसेंबर (News३४) – मकरसंक्रांती पूर्व पतंगप्रेमी आतापासून पतंगोत्सव सुरु करतात मात्र यासाठी प्रतिबंधित नायलॉन मांजाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. नायलॉन मांजाची विक्रीवर आळा यावा याकरिता चंद्रपूर पोलीस विभागाने मूल व दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कारवाई केली.

१० डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या चंद्रपूर पथकाने केली, मुल पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना त्यांना नायलॉन मांजा बाबत गोपनीय माहिती मिळाली होती. (हे हि वाचा – बल्लारपूर मध्ये देशी कट्ट्याचा सुळसुळाट)

नागोसे मोहल्ला मूल या भागात राहणाऱ्या २० वर्षीय साहिल नागोसे यांच्या राहत्या घरी झडती घेतली असता पतंग उडविण्याकरिता वापरण्यात येणारा प्रतिबंधित नायलॉन मांजा ३४ मग प्लास्टिक चक्री किंमत १७ हजार रुपये जप्त करण्यात आला. आरोपी साहिल नागोसे वर पोलीस स्टेशन मूल मध्ये कलम २२३, २९२, ३३६ व ५६ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. पुढील तपास मूल पोलीस करीत आहे. police crackdown manjha

दुसऱ्या कारवाईत दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत विधी संघर्ष बालकाकडून मानवी जीवितास व पर्यावरणास धोकादायक असलेल्या प्रतिबंधित नायलॉन मांजा mono kite fighter ३० मग प्लास्टीकी चक्री किंमत ३० हजार रुपये जप्त करण्यात आला. विधी संघर्ष बालकाने प्रतिबंधित नायलॉन मांजाचा अवैध साठा करून ठेवला होता. या प्रकरणी एकूण ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करीत गुन्हे दाखल केले असून या प्रकरणाचा पुढील तपास दुर्गापूर पोलीस करीत आहे.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, पोलीस उपविभागीय अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे आणि दुर्गापूर पोलीस निरीक्षक संदीप एकाडे यांच्या नेतृत्वात सपोनि सुबोध वंजारी, पोउपनि संतोष निंभोरकर, धनराज करकाडे, अजित शेंडे, प्रफुल गारघाटे, पोउपनि प्रवीण बिंकलवार, शार्दूल, मोरेश्वर गोरे, मंगेश शेंडे व सोनल खोब्रागडे यांनी केली.

जिल्ह्यात कुठेही व्यापारी नायलॉन मांजा विक्री करीत असले किंवा साठवणूक केला असेल त्याबाबत पोलीस नियंत्रण कक्ष ११२ वर तात्काळ संपर्क करावा असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment