Police Verification Delay : चंद्रपूर २१ डिसेंबर २०२५ (News३४ प्रकाश हांडे) – चंद्रपूर महानगरपालिकेच्या आगामी सर्वसाधारण निवडणुका दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी प्रस्तावित आहेत. नामनिर्देशनपत्रे सादर करण्याची अंतिम तारीख २६ डिसेंबर २०२५ ते ३० डिसेंबर २०२५ अशी निश्चित करण्यात आली आहे. या कालावधीत सर्व उमेदवारांकडून अनिवार्यपणे चारित्र्य प्रमाणपत्र (पोलीस व्हेरिफिकेशन प्रमाणपत्र) आवश्यक आहे. (चंद्रपूर मनपाची कांग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती २२ डिसेंबर रोजी)
परंतु चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये (शहर पोलीस ठाणे, रामनगर पोलीस ठाणे, दुर्गापूर पोलीस ठाणे, बडोली पोलीस ठाणे इ.) कर्मचाऱ्यांची कमतरता, अतिरिक्त कामाचा भार आणि योग्य मार्गदर्शनाचा अभाव यामुळे उमेदवारांना चारित्र्य प्रमाणपत्र मिळवण्यात मोठ्या अडचणी आणि अनावश्यक विलंबाचा सामना करावा लागत आहे.
या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी २० डिसेंबर २०२५ रोजी सामाजिक समता संघर्ष समितीच्या वतीने पोलीस अधीक्षक महोदय, चंद्रपूर यांना एक लिखित ज्ञापन सादर करण्यात आले आहे. निवेदनातील मुख्य मागण्या: संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये तात्काळ तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात यावी.
चारित्र्य प्रमाणपत्र प्रक्रिया सुव्यवस्थित आणि जलद करण्यासाठी एक नोडल अधिकारी/समन्वयकाची नियुक्ती करण्यात यावी.
उमेदवारांना योग्य मार्गदर्शन आणि सहाय्य देण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात यावी. Police Verification Delay
निवेदन सादर करण्याच्या वेळी सामाजिक समता संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री. इरफान शेख उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख उपस्थितीमध्ये सचिव श्री. धीरज तामगडे, कार्याध्यक्ष श्री. शशिकांत मेश्राम आणि संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. समितीने आवाहन केले आहे की, माननीय पोलीस अधीक्षक महोदय या विषयाला अत्यंत गांभीर्याने घेऊन तात्काळ आवश्यक पावले उचलावीत, जेणेकरून सर्व उमेदवार वेळेत आवश्यक प्रमाणपत्र प्राप्त करू शकतील आणि निवडणूक प्रक्रिया सुचारूपणे पार पडेल. या मागणीवर पोलीस अधीक्षकांनी सकारत्मक प्रतिसाद देत यावर लवकरचं तोडगा काढू जेणेकरून कुणाला चारित्र्य प्रमाणपत्र देण्यास विलंब होणार नाही.
