Police Verification for Candidates : चंद्रपूर २२ डिसेंबर २०२५ (News३४ प्रकाश हांडे) – चंद्रपूर नगरपरिषद निवडणूक निकालानंतर आता चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक महिन्याभरात पार पडणार आहे, निवडणुकीची रणधुमाळीला सुरुवात झाल्यावर मनपा निवडणुकीतील इच्छुक उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करायला लागणारे कागदपत्रे गोळा करण्यासाठी धावपळ करतो, मात्र या धावपळीत चारित्र्य प्रमाणपत्र तितकेच महत्वाचे. (कांग्रेसची चंद्रपुरात दमदार वापसी)
या प्रमाणपत्रासाठी उमेदवारांनी एकच गर्दी केली होती, उमेदवारांना चारित्र्य प्रमाणपत्रासाठी अर्ज व प्रमाणपत्र लवकर मिळावे यासाठी त्यांची समस्या लक्षात घेता चंद्रपूर पोलिस अधीक्षकांनी जिल्हा विशेष शाखा मध्ये चारित्र्य प्रमाणपत्र सेल ची स्थापना केली आहे. या विभागाचा प्रभार पोलीस उपनिरीक्षक रोशन इरपाचे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
मनपा उमेदवारांना चारित्र्य सत्यापन प्रमाणपत्र काढण्यासंबंधाने कुठलीही अडचण किंवा विलंब होत असल्यास पोउपनि रोशन इरपाचे मोबाईल क्रमांक ७७०९४४८२९८ वर संपर्क साधावा. ऑनलाईन अर्जासाठी उमेदवारांनी https://pcs.mahaonline.gov.in वर अर्ज करावा. असे आवाहन चंद्रपूर पोलीस अधीक्षकांनी केले आहे. Police Verification for Candidates
मनपा उमेदवारांना निवडणूक संबंधाने येणाऱ्या या अडचण बाबत सामाजिक समता संघर्ष समितीचे अध्यक्ष इरफान शेख यांनी दखल घेत पोलीस अधीक्षकांना उपाययोजना करण्यासंबंधीचे निवेदन दिले होते. त्यांच्या मागणीवर सकारात्मकता दर्शवित पोलीस अधीक्षकांनी उमेदवारांना होणाऱ्या अडचणीवर सेल स्थापन केला आहे.
