Chandrapur Road Project Corruption
Chandrapur Road Project Corruption : चंद्रपूर: बागला चौक ते राजीव गांधी इंजीनियरिंग कॉलेज पर्यंत जीवघेणे खड्डे असलेला रस्ता सोडून साडेतीन कोटी रुपयांच्या रस्ता दुभाजकाचे काम करण्याचा प्रस्ताव चंद्रपूर महानगरपालिकेने केला. हा सर्व अट्टाहास मेसर्स सूर्यवंशी एंटरप्राइजेस साठी करण्यात आल्याचा तसेच ह्या कारणामुळे मनपाला एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केला.
खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या कामांमध्ये तत्कालीन आयुक्त पालीवाल यांना कमिशन म्हणून 50 लक्ष रुपयाचे टोकन मिळाले असाही आरोप देशमुख यांनी केला. Chandrapur Paliwal road project commission allegations
Also Read : चंद्रपूर जिल्ह्यात २ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
टोकाच्या स्पर्धेमुळे मनपात काम करणारे कंत्राटदार अंदाजपत्रकीय किमतीपेक्षा 25 ते 30 टक्के कमी दराने काम घेतात. इरई नदीच्या बाजूला तयार करण्यात आलेले विसर्जन कुंड,या ठिकाणी नूकताच नुकताच तयार करण्यात आलेला सिमेंट काँक्रीट प्लॅटफॉर्म, शहरातील अंतर्गत रस्ते दुरुस्तीचे काम या कामांच्या अंदाजपत्रकीय किंमती अनुक्रमे 5 कोटी,1.5 कोटी व 1 कोटी रूपये आहे.ही कामे कंत्राटदारांनी अंदाजपत्रकीय किंमतीपेक्षा अनुक्रमे 22% कमी म्हणजे 3 कोटी 90 लक्ष रुपये,34% कमी म्हणजे जवळपास 1 कोटी रूपये व 25 % कमी म्हणजे 75 लक्ष रुपयांमध्ये घेतले. Chandrapur Municipal Corporation Surya Enterprises contract
इतकी गळेकापू स्पर्धा असताना 3.5 कोटी रुपयांचे रस्ता दुभाजकाचे काम मेसर्स सूर्यवंशी इंटरप्राईजेसला अंदाजपत्रकीय किमतीपेक्षा फक्त 0.01 टक्के कमी दराने म्हणजेच अंदाजपत्रकीय किमतीमध्ये कसे मिळाले ? हा प्रश्न आहे. कोणतेही ठोस कारण न देता या निविदा प्रक्रियेत पाच पैकी तीन एजन्सीला अपात्र करण्यात आले. मर्जीतल्या कंत्राटदारासाठी स्पर्धा संकुचित केल्याने मनपाचे जवळपास एक कोटी रुपयांचे नुकसान झाले व कंत्राटदाराला तेवढाच आर्थिक लाभ झाला. रस्ता दुभाजकाचे काम रद्द करण्यात यावे व विपिन पालीवाल यांची एसआयटी मार्फत चौकशी करून गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी लवकरच जनविकास सेनेतर्फे मोठे जन आंदोलन छेडण्यात येणार आहे अशी माहिती देशमुख यांनी प्रसिद्धपत्रकाद्वारे दिली.
मर्जीतल्या कंत्राटदाराला काम देण्याचा ‘पालीवाल पॅटर्न’
कामाची गरज असो की नसो करायला सोपे व जास्त नफा मिळवून देणारे काम कंत्राटदारासाठी काढायचे. कामाच्या ई-निविदेमध्ये हेतूपुरस्पर अपुरी माहिती टाकायची जेनेकरून कंत्राटदाराला माहितीसाठी मनपाच्या दारात यावे लागेल. कार्यालयात आलेल्या कंत्राटदारांना दलाली करणाऱ्या अधिकाऱ्यांमार्फत धमकावयचे.काम टाकू नका, ई-निविदा प्रक्रियेत सहभागी होऊ नका असे थेट सांगायचे. यानंतरही एखाद्या कंत्राटदाराने काम घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याला नियम धाब्यावर बसवून निविदा प्रक्रियेत अपात्र करायचे. त्यासाठी आधीच निविदेत मर्जीतल्या कंत्राटदाराच्या हिताच्या अटी-शर्ट टाकून ठेवायच्या. या बेकायदेशीर अटी-शर्तींच्या आधारावर स्पर्धा संकुचित करायची. अशा प्रकार मर्जीतल्या कंत्राटदाराला काम द्यायचे व सुरुवातीलाच लाभ मिळवून द्यायचा. त्याच्या मोबदल्यात रोख स्वरूपात कमिशन घ्यायचे. हा चंद्रपूर मनपाचे आयुक्त असताना विपिन पालीवाल यांचा काम वाटण्याचा पॅटर्न होता.