Chandrapur Teacher Recruitment अंतर्गत समाज कल्याण निवासी शाळांतील शिक्षक भरती

B.Ed./D.Ed. धारकांसाठी सरकारी शाळेत नोकरीची संधी

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 23, 2026

चंद्रपूर – Chandrapur Teacher Recruitment अंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिनस्त भिवकुंड (विसापूर) आणि चिमूर येथील शासकीय निवासी शाळांमध्ये शैक्षणिक सत्र 2026-27 साठी शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. घड्याळी तासिका तत्त्वावर ही नियुक्ती केली जाणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी 2 जुलै 2026 रोजी आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मराठी, इंग्रजी, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र विषयांसाठी विविध पदे उपलब्ध आहेत. (कांग्रेस गटनेता पद नियुक्तीला हाय कोर्टाचा ब्रेक)

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर यांच्या अधिनस्त असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा, भिवकुंड (विसापूर), ता. बल्लारपूर तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा, चिमूर, ता. चिमूर, येथे शैक्षणिक सत्र 2026-27 साठी घड्याळी तासिका तत्त्वावर उच्च प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

Chandrapur Teacher Recruitment अंतर्गत कोणती पदे रिक्त?

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी आवश्यक मूळ कागदपत्रे तसेच साक्षांकित छायाप्रतींसह 2 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा, भिवकुंड (विसापूर), ता. बल्लारपूर, येथे उपस्थित राहावे.

रिक्त पदांचा तपशील : 1. शासकीय निवासी शाळा, भिवकुंड (विसापूर), येथे मराठी (इयत्ता 6 वी ते 8 वी) करीता 1 पद, शैक्षणिक पात्रता बी.ए., डी.एड., इंग्रजी विषयाकरीता (इयत्ता 6 वी ते 8 वी) 1 पद – बी.ए., डी.एड., मराठी (इयत्ता 9 वी ते 10 वी) 1 पद, एम.ए., बी.एड., विषय-सामाजिक शास्त्र (इयत्ता 9 वी ते 10 वी)  1 पद – एम.ए., बी.एड.

2. शासकीय निवासी शाळा, चिमूर येथे विषय इंग्रजी (इयत्ता 6 वी ते 8 वी) 1 पद, बी.ए., डी.एड.,विषय-विज्ञान (इयत्ता 6 वी ते 8 वी) 1 पद, बी.एस्सी., डी.एड., विषय-मराठी (इयत्ता 9 वी ते 10 वी) 1 पद, एम.ए., बी.एड., विषय-सामाजिक शास्त्र (इयत्ता 9 वी ते 10 वी) 1 पद, एम.ए., बी.एड. (बार बंद करण्याच्या मागणीसाठी नागरिकांचा रस्ता रोको)

अटी व शर्ती : 1. उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारे करण्यात येईल, 2. निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार व आर्थिक तरतूद उपलब्ध झाल्यानंतर मानधन/वेतन अदा करण्यात येईल. 3.आवश्यकतेनुसार पदांची संख्या कमी अथवा जास्त करण्याचा, भरती प्रक्रिया रद्द करण्याचा किंवा पदे संपुष्टात आणण्याचा अधिकार सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर यांना राहील. 4.मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना कोणताही प्रवास भत्ता देय राहणार नाही.

अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी संबंधित शाळेशी अथवा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, चंद्रपूर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment