Gondpipri Protest Case अंतर्गत वढोली येथे रास्ता रोको आंदोलन

बार बंदच्या मागणीसाठी 9 तास रस्ता रोखला; अखेर 250 जणांवर गुन्हा?

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 21, 2026

गोंडपिपरी (चंद्रपूर): Gondpipri Protest Case प्रकरणामुळे चंद्रपूर जिल्ह्यात मोठी चर्चा रंगली आहे. गोंडपिपरी तालुक्यातील वढोली येथे एस. के. बिअर बार कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी तब्बल 9 तास मुख्य रस्ता रोखून धरला. या आंदोलनामुळे वढोली-मूल-पोंभूर्णा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. प्रशासनाच्या वारंवार विनंतीनंतरही आंदोलन सुरू राहिल्याने अखेर पोलिसांनी 26 जणांसह सुमारे 250 आंदोलकांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे अशी माहिती पुढे आली आहे. (२१ जून रोजी चंद्रपुरात ३ हजार विद्यार्थी देणार नीट परीक्षा)

स्थानिक एस. के. बिअर बार व रेस्टॉरंट कायमचे बंद करण्यात यावे या मागणीसाठी वढोली येथील गावकऱ्यांनी अचानक मुख्य महामार्गावर ठिय्या आंदोलन करत तब्बल ९ तास रस्ता रोखून धरला. १९ जून २०२६ रोजी संध्याकाळी ५:०० वाजल्यापासून ते २० जून २०२६ रोजी पहाटे २:०० वाजेपर्यंत चाललेल्या या तीव्र ‘रास्ता रोको’ आंदोलनामुळे वढोली ते मूल/पोंभुर्णा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या प्रकरणी गोंडपिपरी पोलिसांनी बेकायदेशीर जमाव जमवून प्रवाशांना वेठीस धरल्याप्रकरणी २६ नागरिकांसह अन्य २०० ते २२५ आंदोलकांवर गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती आहे.

Gondpipri Protest Case मध्ये नेमके काय घडले?

नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, वढोली गावाच्या हद्दीतील ‘एस. के. बार अँड रेस्टॉरंट’ बंद व्हावे, अशी स्थानिक नागरिकांची मागणी होती. या मागणीसाठी १९ जून रोजी सायंकाळी ५ वाजता सुमारे ५० ते १०० नागरिक वढोली ते मूल जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मधोमध ठिय्या देऊन बसले. आंदोलकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूंची वाहतूक अडवून धरल्याने महामार्गावर वाहनांच्या २ किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या. यामुळे प्रवाशांना आणि सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला.

प्रशासनाच्या विनंतीकडे दुर्लक्ष, ९ तासानंतर आंदोलन मागे घटनेची माहिती मिळताच उपविभागीय दंडाधिकारी अर्जुन पावरा, उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले आणि तहसीलदार शुभम बहाकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बार मालक निलेश संगमवार यांनी स्वतःहून बार बंद केला, तरीही आंदोलक रस्त्यावरून उठण्यास तयार नव्हते. अधिकार्‍यांनी आंदोलकांना कायदा हातात न घेता कायदेशीर मार्गाने मागण्या पूर्ण करण्याचे आवाहन केले व रस्ता खुला करण्याची विनंती केली. मात्र, बार पूर्णपणे बंद होईपर्यंत हटणार नाही, अशी भूमिका जमावाने घेतली. अखेर, उपविभागीय दंडाधिकारी अर्जुन पावरा यांनी सदर बार तात्पुरता बंद करण्याबाबतचे लेखी आश्वासन दिल्यानंतर, पहाटे २ च्या सुमारास गावकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले आणि वाहतूक सुरळीत झाली.

शासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता बेकायदेशीर जमाव जमवून प्रशासनाला वेठीस धरल्याप्रकारणी, वढोली बीटचे अंमलदार पोलीस हवालदार अनुप मनोहरराव कवठेकर यांच्या तक्रारीवरून गोंडपिपरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व करणारे राजेश कवठे, मोहन चौधरी, घनश्याम कोहपरे, सुरेश मांडुरवार, श्रीकांत कानकाटे, नितीन सेकृतवार, भारत धंदरे, अखिल कोहपरे, रुपेश मेधाडे, मनिषा कोहपरे, राणी कोहपरे, रोहीती कवठे, अल्का गेडाम यांच्यासह २६ नामजद आणि इतर २०० ते २२५ अशा एकूण जवळपास २५० आंदोलकांवर भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम १८९(२), १९०, १२६(२), २२३ आणि क्रिमिनल अमेंडमेंट ॲक्ट १९३२ च्या कलम ७ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश कराडे करत आहेत.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment