Chandrapur Court Verdict मध्ये नागभीड हत्या प्रकरणी आरोपीला जन्मठेप

‘लग्न कर नाहीतर…’ नकारानंतर हत्या; 5 वर्षांनंतर न्याय

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 23, 2026

चंद्रपूर (नागभीड): Chandrapur Court Verdict अंतर्गत नागभीड येथील गंगा माता चौक परिसरात एकतर्फी प्रेमातून महिलेचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपी विवेक ब्रम्हदास चौधरी याला चंद्रपूर जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 2021 मध्ये घडलेल्या या थरारक हत्याकांडाचा निकाल तब्बल पाच वर्षांनंतर लागला असून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत कठोर शिक्षा सुनावली आहे. या निर्णयामुळे नागभीड परिसरात पुन्हा एकदा या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. (अमावस्या, पौर्णिमेला घराबाहेर काळा जादू, सीसीटीव्ही मध्ये दिसलं धक्कादायक)

नागभीड येथील गंगा माता चौक परिसरात एकतर्फी प्रेमातून एका महिलेचा चाकूने गळा चिरून अत्यंत निर्घृणपणे खून करणाऱ्या नराधम आरोपीला चंद्रपूर जिल्हा सत्र न्यायालयाने आजन्म कारावास (जन्मठेप) आणि १५ हजार रुपये दंडाची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. विवेक ब्रम्हदास चौधरी (रा. चिखलपरसोडी, ता. नागभीड) असे जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. हा थरारक आणि मन हेलावून टाकणारा घटनाक्रम १४ ऑगस्ट २०२१ रोजी घडला होता, ज्याचा निकाल आता पाच वर्षांनंतर लागला आहे.

Chandrapur Court Verdict मध्ये आरोपीला जन्मठेप

पोलीस स्टेशन नागभीड अंतर्गत येणाऱ्या चिखलपरसोडी येथील आरोपी विवेक चौधरी याचे त्याच्याच मित्राने सोडलेल्या एका महिलेवर एकतर्फी प्रेम होते. “माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू माझ्याशी लग्न कर” असा तगादा त्याने गंगा माता चौक नागभीड येथे पीडित महिलेकडे लावला होता. मात्र, पीडित महिलेने त्याच्या या मागणीला आणि लग्नाला साफ नकार दिला. याच गोष्टीचा मनात तीव्र राग धरून नराधम विवेकने अत्यंत क्रूरपणे चाकूने त्या महिलेचा गळा कापून तिचा निर्घृण खून केला होता.

या घटनेने संपूर्ण नागभीड परिसरात मोठी खळबळ उडाली होती. घटनेच्या दिवशीच नागभीड पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३०२, ४५०, १०९, ३५४(ड), ५०४, ५०६ तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (अ‍ॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी (ब्रम्हपुरी) मिलिंद शिंदे यांनी करून अत्यंत भक्कम पुराव्यांसह चंद्रपूर जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

माहितीनुसार, या प्रकरणाची दीर्घ सुनावणी चंद्रपूर न्यायालयात चालली. सरकारी वकील श्रीमती रामटेके मॅडम यांनी सरकार पक्षाची बाजू अत्यंत प्रभावीपणे मांडली आणि साक्षीदार व पुरावे न्यायालयासमोर सादर केले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पोलिसांचा तपास ग्राह्य धरून १९ जून २०२६ रोजी आरोपी विवेक ब्रम्हदास चौधरी याला दोषी ठरवले. त्यानुसार न्यायालयाने त्याला कलम ३०२ अंतर्गत आजन्म कारावास आणि १५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास आणखी १ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

यासोबतच कलम ४५० मध्ये ३ वर्षे सक्तमजुरी व १ हजार रुपये दंड आणि कलम ३५४ (ड) मध्ये २ वर्षे सक्तमजुरी व १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेत कोर्ट पैरवी म्हणून नागभीड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कुंदन वाघमारे आणि महिला पोलीस अंमलदार प्रिती पिंगे यांनी महत्त्वाची भूमिका बजावून आरोपीला गजाआड पोहोचवण्यास मदत केली.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment