चंद्रपूर – Chandrapur Moharram Orders अंतर्गत मोहरमच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना विशेष अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 36 अन्वये हे आदेश जारी केले आहेत. 25 व 26 जून रोजी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रम आणि मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विविध निर्बंध आणि नियम लागू करण्यात आले आहेत. (सुरेंद्र अडबाले यांच्या नियुक्तीला हायकोर्टाचा ब्रेक)
मोहरमच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 36 अन्वये विशेष अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी निर्गमित केले आहेत.
Chandrapur Moharram Orders अंतर्गत कोणते अधिकार देण्यात आले?
मोहरम 17 जून ते 26 जून 2026 या कालावधीत संपन्न होत असून दि. 25 व 26 जून रोजी मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रम व मिरवणुका आयोजित केल्या जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी 24 जून 2026 रोजी मध्यरात्री 12 वाजतापासून 26 जून रोजी रात्री 24 वाजेपर्यंत विशेष निर्देश लागू राहतील. (सोनं गहाण ठेवले आणि पैसे गुंतवले, फसवणूक)
सदर आदेशान्वये पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना मिरवणुका व सभांमधील लोकांच्या वर्तनाबाबत निर्देश देणे, मिरवणुकांचे मार्ग व वेळ निश्चित करणे, धार्मिक स्थळांच्या परिसरात आवश्यक निर्बंध लागू करणे, सार्वजनिक ठिकाणी वाद्य, ढोल-ताशे व ध्वनिक्षेपकांच्या वापरावर नियंत्रण ठेवणे तसेच सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक सूचना देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.
तसेच सार्वजनिक सभा, मिरवणुका, वाद्य वाजविणे, ध्वनिक्षेपकांचा वापर तसेच घोषणाबाजी यासाठी संबंधित पोलीस ठाण्याची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे. सर्व नागरिकांनी पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून कायदा व सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी केले आहे.
मोहरम उत्सव शांततेत व सलोख्याच्या वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
चंद्रपूर जिल्हा कारागृहातील समाधीस्थळी उर्सानिमित्त 25 व 26 जून रोजी भाविकांसाठी प्रवेश
चंद्रपूर जिल्हा कारागृहाच्या परिसरातील पुज्य हजरत मखदुम शाहबुद्दीन शहा उर्फ गैबीशहा वली यांच्या समाधीस्थळी मोहर्रम सणानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही उर्स (यात्रा) आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने 25 जून व 26 जून 2026 रोजी भाविकांना समाधी दर्शनासाठी कारागृह परिसरात प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती कारागृह प्रशासनाने दिली आहे.
चंद्रपूर जिल्हा कारागृहाच्या पश्चिम दिशेला मुख्य तट क्र. 02 जवळ असलेल्या पुज्य हजरत मखदुम शाहबुद्दीन शहा उर्फ गैबीशहा वली यांच्या समाधीस्थळी दरवर्षी मोहर्रम सणानिमित्त उर्सचे आयोजन करण्यात येते. या उर्सासाठी चंद्रपूर जिल्ह्यासह परिसरातील विविध समाजातील मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी उपस्थित राहतात.
उर्स कालावधीत समाधी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कारागृह परिसरात प्रवेश दिला जाणार आहे. तथापि, सुरक्षा व शिस्तीच्या दृष्टीने कारागृह परिसरात मोबाईल फोन, कॅमेरा तसेच पेढे, बर्फी किंवा इतर कोणतेही खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. प्रतिबंधित वस्तू आढळून आल्यास संबंधित भाविकास प्रवेश नाकारण्यात येईल.
भाविकांनी कारागृह प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून दर्शनासाठी यावे तसेच प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रभारी अधीक्षक, चंद्रपूर जिल्हा कारागृह यांनी केले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






