Chandatai Vairagade Birthday celebration with senior citizens in Chandrapur

चंद्रपूरच्या मातोश्री वृद्धाश्रमात चंदाताई वैरागडे यांचा वाढदिवस; ज्येष्ठांसोबत स्नेहभोजनाने जिंकली मने

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 23, 2026

चंद्रपूर: (Chandatai Vairagade Birthday) निमित्त चंद्रपूर शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा चंदाताई वैरागडे यांनी सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला. त्यांनी स्थानिक मातोश्री वृद्धाश्रमात जाऊन ज्येष्ठ नागरिकांसोबत वाढदिवस साजरा केला. यावेळी वृद्धांना स्नेहभोजन देण्यात आले. त्यांच्या या उपक्रमामुळे उपस्थित ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. सामाजिक कार्याला प्राधान्य देणाऱ्या या उपक्रमाचे चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे. (कर्जमाफीच्या घोषणा देत शेतकरी बैलाची सवारिक करीत शिरला तहसील कार्यालयात)

सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील आघाडीचे नेतृत्व, चंद्रपूर शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा तथा महानगरपालिकेच्या नगरसेविका आणि स्थायी समिती सदस्या सौ. चंदाताई वैरागडे यांनी आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा केला. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी कोणताही थाटमाट न करता स्थानिक ‘मातोश्री वृद्धाश्रमात’ जाऊन तेथील वृद्ध माता-पित्यांसोबत आपला वाढदिवस साजरा केला. याप्रसंगी त्यांनी वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना प्रेमाचे स्नेहभोजन दिले. चंदाताईंच्या या आपुलकीने भारावून जात वृद्धाश्रमातील माता-पित्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले, ज्यामुळे उपस्थित सर्वांचेच मन हेलावून गेले.

Chandatai Vairagade Birthday चर्चेचा विषय का ठरला?

चंदाताई वैरागडे या अनेक महत्त्वाच्या पदांवर कार्यरत असूनही, दरवर्षी वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन वृक्षारोपण आणि वृद्धांना स्नेहभोजन यांसारखे सामाजिक उपक्रम राबवतात. वृद्धाश्रमातील ज्येष्ठांच्या सहवासात वेळ घालवून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा त्यांचा हा स्तुत्य उपक्रम नागरिकांसाठी आदर्श ठरत आहे.

काँग्रेस नेत्यांसह मान्यवरांची उपस्थिती वृद्धाश्रमात आयोजित या कार्यक्रमाला चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिवा राव, काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष रामूभाऊ तिवारी, ओबीसी काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस प्राचार्य नरेंद्र बोबडे, अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सागर खोब्रागडे आणि युवक काँग्रेसचे नौशाद भाई यांनी प्रामुख्याने उपस्थित राहून चंदाताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच सर्वांनी वृद्धाश्रमातील माता-पित्यांचे आशीर्वाद घेतले.

याप्रसंगी रणरागिणी महिला पतसंस्थेच्या पदाधिकारी, विविध महिला बचत गट, सावित्री बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी, वैरागडे व इटनकर कुटुंबीय आणि आप्तपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment