चंद्रपूर: Chanda Vairagade Corporator चंद्रपूर महानगरपालिकेच्या नगरसेविका सौ. चंदाताई वैरागडे यांनी आपल्या स्वेच्छानिधीतून बाबूपेठ प्रभागातील अंधाराची समस्या सोडवली आहे. सवारी बंगला भागात अनेक दिवसांपासून पथदिवे नव्हते. त्यामुळे स्थानिकांना रात्री ये-जा करताना मोठा त्रास होत होता. या समस्येची दखल घेत त्यांनी हायमास्ट दिवा उपलब्ध करून दिला. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर या दिव्याचे लोकार्पण करण्यात आले. यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. (हे हि वाचा – चंद्रपुरात बांबू ने साकारला बाप्पा)
बाबूपेठ प्रभागातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पथदिव्यांची सोय नसल्यामुळे स्थानिक नागरिकांना रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर अंधाराचा सामना करावा लागत होता. विशेषतः सवारी बंगला परिसरामध्ये अंधारामुळे नागरिकांची होणारी गैरसोय आणि सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता, महानगरपालिकेच्या नगरसेविका तथा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ. चंदाताई वैरागडे यांनी तत्परतेने दखल घेतली. त्यांनी महानगरपालिकेकडून प्राप्त होणाऱ्या आपल्या स्वेच्छानिधीतून या परिसरात हायमास्ट दिवा उपलब्ध करून दिला आहे.
गणेश चतुर्थीचे औचित्य साधून या हायमास्टचे लोकार्पण प्रभागातील ज्येष्ठ नागरिक श्री. नामदेव घोरुडे व श्री. सुरेश वैरागडे यांच्या हस्ते करण्यात आले. या लोकार्पण सोहळ्यास नगरसेविका सौ. अनिता चौखे, नगरसेविका सौ. करिष्मा जंगम यांच्यासह परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या हायमास्टमुळे सवारी बंगला परिसरातील अंधार दूर झाला असून, नागरिकांसाठी रात्रीची ये-जा सुलभ आणि सुरक्षित झाली आहे.
“प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि त्यांची सुरक्षितता याला सर्वोच्च प्राधान्य देणे हे माझे कर्तव्य आहे. प्रभागातील नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक समस्येचे निवारण करण्यासाठी मी सातत्याने कटिबद्ध असून, बाबूपेठचा प्रत्येक भाग प्रकाशमय व सुविधायुक्त करण्याचा माझा मानस आहे,” असा विश्वास यावेळी नगरसेविका सौ. चंदाताई वैरागडे यांनी व्यक्त केला.
गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीची त्वरित दखल घेऊन स्वेच्छानिधीतून हायमास्ट उपलब्ध करून दिल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, सौ. चंदाताई वैरागडे यांचे आभार मानले आहेत. स्थानिक समस्या मार्गी लावून प्रभागाच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याच्या त्यांच्या या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






