चंद्रपूर – BRTC Chichpalli Bamboo Ganpati उपक्रमाने संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे. चिचपल्ली येथील बांबू संशोधन केंद्रात विद्यार्थ्यांनी चक्क बांबूपासून गणेशमूर्ती साकारली.
‘बांबूटूबाप्पा’ या अभिनव उपक्रमातून तयार केलेल्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. या पर्यावरणपूरक उपक्रमाने केंद्रात ‘जागतिक बांबू सप्ताह २०२६’चा उत्साहात शुभारंभ झाला आहे.
BRTC Chichpalli Bamboo Ganpati : परंपरेसह तंत्रज्ञानाचा अनोखा संगम
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र (बीआरटीसी) चिचपल्ली येथील विद्यार्थ्यांनी चक्क बांबूपासून आकर्षक श्री गणेशमूर्ती साकारली आहे. ‘बांबूटूबाप्पा’ या अभिनव उपक्रमातून तयार करण्यात आलेल्या या गणेशमूर्तीची विधिवत स्थापना करून केंद्रात ‘जागतिक बांबू सप्ताह २०२६’चा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. (हे हि वाचा – विना परवाना डीजे वाजला, पोलिसांची कारवाई, डीजे जप्त)
महाराष्ट्र वन विभागाच्या बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रात 14 ते 18 सप्टेंबर या कालावधीत ‘जागतिक बांबू सप्ताह २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी ‘डिप्लोमा इन बांबू टेक्नॉलॉजी’च्या विद्यार्थ्यांनी सामूहिकरीत्या तयार केलेली बांबूची गणेशमूर्ती विशेष आकर्षण ठरली.
‘बांबू टू बाप्पा’ अभिनव उपक्रमातून साकारली मनमोहक मूर्ती
बांबूपासून पर्यावरणपूरक आणि कलात्मक गणेशमूर्ती साकारून विद्यार्थ्यांनी परंपरा, पर्यावरण संवर्धन आणि आधुनिक बांबू तंत्रज्ञानाचा अनोखा संगम घडवून आणला आहे. बांबूचा उपयोग केवळ पारंपरिक वस्तू तयार करण्यापुरता मर्यादित नसून आधुनिक डिझाईन, कलाकृती, शाश्वत उत्पादने आणि उद्योजकतेसाठीही प्रभावीपणे होऊ शकतो, असा संदेश या गणेशमूर्तीच्या माध्यमातून देण्यात आला.
या उपक्रमामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या संकल्पनेलाही नवे स्वरूप मिळाले आहे. निसर्गाशी सुसंगत असलेल्या बांबूचा कल्पकतेने वापर करून विद्यार्थ्यांनी तयार केलेला ‘बांबूचा बाप्पा’ उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता. विद्यार्थ्यांच्या कल्पकता आणि कौशल्याचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाला बीआरटीसीचे संचालक उमेश वर्मा, वनक्षेत्रपाल सतीश शेंडे, चिचपल्लीचे सरपंच चंदन उचेकर, न्यू एरा क्लिनिक सोल्युशनचे सचिन धात्रक आणि बीआरटीसीचे अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बांबू हे ‘हरित सोने’ असून बांबूवर आधारित पर्यावरणपूरक उत्पादने, कौशल्य विकास, रोजगारनिर्मिती आणि ग्रामीण उद्योजकतेच्या माध्यमातून शाश्वत आर्थिक विकासाला मोठी चालना मिळू शकते, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
‘जागतिक बांबू सप्ताह २०२६’ अंतर्गत तांत्रिक सत्रे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, विद्यार्थी उपक्रम, स्पर्धा आणि जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाचा समारोप १८ सप्टेंबर रोजी ‘जागतिक बांबू दिना’च्या विशेष कार्यक्रमाने होणार आहे. यावर्षीच्या सप्ताहाची संकल्पना ‘बांबू फॉर द फ्युचर – फ्रॉम ट्रॅडिशन टू इनोवेश’ अशी असून बांबू संशोधन, नवोपक्रम, शाश्वत उपजीविका आणि हरित अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देणे, हा त्यामागील प्रमुख उद्देश आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






