Mahakali Temple Solar Project पाहणी करताना महावितरण संचालक धनंजय औंढेकर आणि अधिकारी

चंद्रपुरात श्री महाकाली मंदिरात अतिरिक्त १० किलोवॅटचा सौर प्रकल्प; महावितरणचा पुढाकार

User avatar placeholder
Written by Prakash Hande

September 14, 2026

चंद्रपूर: Mahakali Temple Solar Project संदर्भात चंद्रपुरात अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. महावितरणचे संचालक धनंजय औंढेकर यांनी श्री महाकाली मंदिराला भेट देऊन पाहणी केली.

मंदिराचे वाढते वीज बिल कमी करण्यासाठी अतिरिक्त १० किलोवॅटचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय झाला. तसेच ऐतिहासिक अंचलेश्वर महादेव मंदिरात ५ किलोवॅटचा प्रकल्प बसवला जाईल. यामुळे मंदिर परिसराला सौरऊर्जेची मोठी मदत मिळेल. (हे हि वाचा – चंद्रपुरात बांबूपासून साकारला बाप्पा)

Mahakali Temple Solar Project : मंदिराला मिळणार हक्काची हरित ऊर्जा

महावितरण कंपनीचे संचालक (संचलन) धनंजय औंढेकर यांनी चंद्रपूर परिमंडळ दौऱ्यादरम्यान चंद्रपूरचे आराध्य दैवत प्रसिद्ध श्री महाकाली मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंदिर परिसराची पाहणी करत मंदिर व्यवस्थापनाशी विविध विषयांवर चर्चा केली. चर्चेदरम्यान मंदिरामध्ये सध्या कार्यान्वित असलेल्या ५ किलोवॅट क्षमतेच्या सोलर रूफटॉप प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. तसेच मंदिरातील विजेचा वाढता वापर आणि त्यामुळे येणाऱ्या वीज बिलाबाबत सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.

अभियंता दिनाचे औचित्य साधून महावितरण व सोलर एजन्सीचा पुढाकार

मंदिराची विजेची गरज आणि वीज बिलाचा भार लक्षात घेता, अभियंता दिनाचे औचित्य साधून उपस्थित महावितरणचे अभियंता, कर्मचारी आणि सोलर एजन्सी यांनी मंदिर परिसराला ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला. त्यानुसार महाकाली मंदिर परिसरात अधिक क्षमतेचा म्हणजेच अतिरिक्त १० किलोवॅटचा सोलर रूफटॉप प्रकल्प, तर ऐतिहासिक अंचलेश्वर महादेव मंदिर येथे ५ किलोवॅट क्षमतेचा सोलर रूफटॉप प्रकल्प बसविण्याचा निर्णय संचालक धनंजय औंढेकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.

या निर्णयाचे स्वागत करताना संचालक धनंजय औंढेकर यांनी सांगितले की, सोलर एजन्सी आणि अभियंत्यांनी घेतलेल्या या पुढाकारामुळे मंदिराच्या वीज बिलात मोठी बचत होणार असून हरित ऊर्जेलाही चालना मिळेल. याप्रसंगी चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता हरीश गजबे, अधीक्षक अभियंता (पायाभूत आराखडा) रमेश सानप, अधीक्षक अभियंता मनोज धाबर्डे, अधीक्षक अभियंता प्रकाश खांडेकर यांच्यासह महावितरणचे इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment