Jiwati Maternal Death प्रकरणावर विधानसभेत आमदार सुधाकर अडबाले यांचा सरकारला सवाल

१२ किमी उचलून नेले… पुढे जे घडले ते धक्कादायक, आमदार सुधाकर अडबाले यांचा सरकारवर हल्लाबोल

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 30, 2026

मुंबई / चंद्रपूर : Jiwati Maternal Death प्रकरणामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिवती तालुक्यातील घोडणकापी येथे रस्त्याअभावी आणि वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. या घटनेची दखल घेत आमदार सुधाकर अडबाले यांनी विधानसभेत नियम २६० अंतर्गत सरकारचे लक्ष वेधले. दुर्गम आदिवासी भागातील आरोग्य सुविधा, रस्ते आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवांबाबत तातडीच्या उपाययोजनांची मागणी करण्यात आली. (वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने ६ वर्षीय बालकाचा मृत्यू)

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात उपचाराअभावी गर्भवती महिलेचा झालेला मृत्यू अत्यंत दुर्दैवी असून हा राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवरील गंभीर प्रश्न असल्याचे सांगत आमदार सुधाकर अडबाले यांनी विधिमंडळाच्या सभागृहात नियम २६० च्या प्रस्तावावर बोलताना सरकारचे लक्ष वेधले.

Jiwati Maternal Death प्रकरणावर विधानसभेत चर्चा

आमदार अडबाले म्हणाले की, स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे झाली, महाराष्ट्र विकासाच्या मोठमोठ्या घोषणा करत आहे. समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग, मेट्रो, उड्डाणपूल आणि स्मार्ट सिटीसारख्या प्रकल्पांची चर्चा होत असताना चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील घोडणकापी येथील २५ वर्षीय संगीता गेडाम यांना प्रसूतीसाठी तब्बल १२ किलोमीटर उचलून न्यावे लागले. रस्त्याअभावी आणि रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्याने वाटेतच त्यांची प्रसूती झाली. त्यानंतर अतिरक्तस्राव (ब्लीडिंग) झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

ही घटना राज्यासाठी अत्यंत लाजिरवाणी असल्याचे सांगत त्यांनी दुर्गम आदिवासी भागातील आरोग्य सुविधा, रस्ते आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवांची दयनीय अवस्था अधोरेखित केली. आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे पालकमंत्री असतानाही अनेक गावांपर्यंत रस्ते आणि मूलभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

मृत संगीता गेडाम या गावातील एकमेव अंगणवाडी सेविका होत्या. त्यांच्या पश्चात तीन वर्षांचे एक अपत्य आणि नुकतेच जन्मलेले नवजात बाळ आहे. या दोन्ही मुलांच्या संगोपनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याचेही आमदार अडबाले यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर जबाबदारी निश्चित करावी, दुर्गम आदिवासी भागात तातडीने रस्ते, रुग्णवाहिका आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून अशा घटना पुन्हा घडणार नाहीत यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी सरकारकडे केली.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment