चंद्रपूर – (Chandrapur Water Supply) अंतर्गत अमृत 2.0 वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या कामांची महानगरपालिका आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी केली. जलशुद्धीकरण केंद्र, जलकुंभ, पंपिंग स्टेशन आणि जलवाहिन्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर इरई धरण परिसरात संयुक्त पाहणी करून उपलब्ध जलसाठा आणि भविष्यातील पाणी नियोजनावर चर्चा झाली. प्रकल्पाची कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. (एसटी बस व गिट्टी ट्र्क ची धडक, ३५ प्रवासी जखमी)
चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘अमृत 2.0 चंद्रपूर शहर वाढीव पाणीपुरवठा योजना’ अंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांची मा. आयुक्त यांनी प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी केली. यावेळी योजनेच्या विविध घटकांच्या प्रगतीचा आढावा घेऊन कामांचा दर्जा, गुणवत्ता तसेच उर्वरित कामांचे नियोजन याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
Chandrapur Water Supply : अमृत 2.0 योजनेच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी
यावेळी महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (PMC), कंत्राटदाराचे प्रतिनिधी तसेच अभियंते उपस्थित होते. मा. आयुक्तांनी जलशुद्धीकरण केंद्र, जलकुंभ, पंपिंग स्टेशन, मुख्य जलवाहिन्या, वितरण जलवाहिन्या तसेच इतर पाणीपुरवठा पायाभूत सुविधांच्या सुरू असलेल्या कामांची पाहणी करून प्रत्यक्ष प्रगतीची माहिती घेतली. तसेच कामांचा दर्जा कायम राखून नियोजनबद्ध व गतीने कामे पूर्ण करण्याबाबत संबंधितांना निर्देश दिले.
त्यानंतर शहराच्या भविष्यातील पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने मा. आयुक्तांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत इरई धरण परिसराची संयुक्त पाहणी केली. संभाव्य कमी पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर धरणातील उपलब्ध जलसाठा, आगामी पाणी उपलब्धता तसेच शहरासाठी आवश्यक जलनियोजनाबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच उपलब्ध जलस्रोतांचे प्रभावी व्यवस्थापन करून शहराचा पाणीपुरवठा अखंडित व सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
पाहणीदरम्यान मा. आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामांच्या प्रगतीवर नियमित देखरेख ठेवण्याच्या, आवश्यकतेनुसार मनुष्यबळ व यंत्रसामग्री वाढवून कामांना गती देण्याच्या तसेच नागरिकांना कमीत कमी गैरसोय होईल याची दक्षता घेत प्रकल्पाची कामे विहित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






