Ballarpur Satta Raid मध्ये बल्लारपूर येथे एलसीबीची सट्टा जुगार अड्ड्यावर कारवाई

बल्लारपूरमध्ये सट्टा अड्ड्यावर एलसीबीचा छापा

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 4, 2026

बल्लारशाह – (Ballarpur Satta Raid) अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत कल्याण सट्टा जुगार अड्ड्याचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी छापा टाकून दोन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सट्ट्याची चिठ्ठी, बॉलपेन आणि रोख रक्कम जप्त केली. या कारवाईत ई-साक्ष ॲपद्वारे डिजिटल पंचनामा करण्यात आला. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बल्लारशाह पोलिसांकडून सुरू आहे. (चंद्रपुरात फोन पे स्कॅम, १५ हजार रुपयांचा चुना)

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाह पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) एका खात्रीशीर माहितीच्या आधारे धडक कारवाई करत सट्टा जुगार अड्ड्याचा पर्दाफाश केला आहे. ३ जुलै २०२६ रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास मौजा साईबाबा वार्ड, बल्लारपूर येथे ही कारवाई करण्यात आली. पोलीस हवालदार किशोर दामोधर वैरागडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पंचांसमक्ष या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी संतोष नथ्थुजी भोयर याच्या घरासमोर लोकांकडून पैसे घेऊन कल्याण सट्टापट्टीचे आकडे लिहून जुगार खेळवला जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

Ballarpur Satta Raid : बल्लारपूरमध्ये एलसीबीची धडक कारवा

पोलिसांनी तातडीने कारवाई करत सत्यवंनसिंग राजेंद्रसिंग दिगवा (वय ३६, रा. साईबाबा वार्ड, बल्लारपूर) याला घटनास्थळावरून ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली असता, बाजूलाच उभा असलेला संतोष नथ्थुजी भोयर (वय ५४, रा. साईबाबा वार्ड, बल्लारपूर) हा त्याला हा जुगार चालवण्यास मदत करत असल्याची कबुली त्याने दिली.

या छाप्यात पोलिसांनी दोन्ही आरोपींची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडून सट्ट्याचे आकडे लिहिलेली चिठ्ठी, एक निळ्या शाईचा बॉलपेन आणि जुगाराचे १,००० रुपये नगदी असा एकूण १,०१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे, ही संपूर्ण जप्तीची कारवाई कायदेशीर पारदर्शकतेसाठी मोबाईलमधील ‘ई-साक्ष’ ॲपद्वारे करण्यात आली असून त्याचा डिजिटल आयडी (SID NO) देखील प्राप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलीस हवालदार किशोर वैरागडे यांच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींविरुद्ध बल्लारशाह पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२(अ) आणि भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक बिपीन सुभाष इंगळे यांच्या मार्गदर्शनात या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार विजय हरिभाऊ वैद्य यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment