Chimur Tiger Attack Incident at Barandghat Chandrapur

चिमूर तालुक्यातील बरंडघाट येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार; चंद्रपूर जिल्ह्यातील मानव-वन्यजीव संघर्षाचा हा २३ वा बळी

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 6, 2026

चिमूर : चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक (Chimur Tiger Attack Incident) घटना समोर आली आहे. बरंडघाट वनपरिक्षेत्रात सोमवारी सकाळी शेतातील कामासाठी गेलेल्या एका शेतकऱ्यावर वाघाने भीषण हल्ला केला. या वाघाच्या हल्यात राजेंद्र तिमाजी भोयर (वय ५०) या शेतकऱ्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षातील हा २३ वा बळी ठरल्याने परिसरात प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

Chimur Tiger Attack Incident : बरंडघाट परिसरात वाघाची दहशत

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील बरंडघाट परिसरात सोमवारी सकाळी वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. राजेंद्र तिमाजी भोयर (वय ५०, रा. बरंडघाट) असे मृताचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मानव-वन्यजीव संघर्षातील हा २३ वा बळी ठरल्याने वनविभागाच्या उपाययोजनांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. (शेतात काम करीत असताना वाघाचा हल्ला, शेतकरी ठार)

मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र भोयर हे विश्वनाथ भोयर यांच्यासोबत शेतीसाठी फाटे तोडण्याच्या कामानिमित्त जंगलात गेले होते. यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर झडप घालत भीषण हल्ला केला. हल्ला इतका गंभीर होता की, राजेंद्र भोयर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा व पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

या घटनेनंतर बरंडघाटसह आसपासच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जंगलालगत शेती करणारे शेतकरी, शेतमजूर तसेच जनावरे चारण्यासाठी जंगल परिसरात जाणाऱ्या नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली असून, अत्यावश्यक कामाशिवाय जंगलात जाणे टाळावे आणि सतर्कता बाळगावी, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, संतप्त ग्रामस्थांनी वारंवार घडणाऱ्या वाघाच्या हल्ल्यांवर प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. परिसरात वनविभागाने तातडीने गस्त वाढवावी, वाघाचा बंदोबस्त करावा तसेच मृत राजेंद्र भोयर यांच्या कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक मदत व शासकीय नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या घटनेमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, वनविभाग आणि प्रशासनाकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment