चंद्रपूर: (Chandrapur Accident News) चंद्रपूर शहरातील रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ताडोबा रोडवर आज सकाळी एका भरधाव बसने सायकलस्वाराला चिरडल्याची अत्यंत दुर्दैवी आणि भीषण दुर्घटना घडली आहे. या अपघातात सायकलस्वाराचा जागीच वेदनादायक मृत्यू झाला असून, सकाळी सकाळीच घडलेल्या या घटनेमुळे तुकूम आणि ताडोबा रोड परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विनायक गंगाधर पराते (वय ५३ वर्षे, रा. तुकूम) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
Chandrapur Accident News: तुकूम परिसरात भरधाव बसचा कहर
रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ताडोबा रोडवर आज सकाळी एका भरधाव बसने सायकलस्वाराला चिरडल्याची अत्यंत दुर्दैवी आणि भीषण दुर्घटना घडली आहे. या अपघातात सायकलस्वाराचा जागीच वेदनादायक मृत्यू झाला असून, सकाळी सकाळीच घडलेल्या या घटनेमुळे तुकूम आणि ताडोबा रोड परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (चंद्रपुरात सराईत गुन्हेगाराला अटक, पिस्टल व जिवंत काडतुसे जप्त)
मिळालेल्या माहितीनुसार, तुकूम परिसरातील पोलीस हॉल समोर आज, ११ जुलै रोजी सकाळी हा अपघात झाला. विनायक गंगाधर पराते (वय ५३ वर्षे, रा. तुकूम) हे आपल्या सायकलने नेहमीप्रमाणे जात असताना, अचानक आलेल्या MH 40 N 9429 या क्रमांकाच्या बसने त्यांच्या सायकलला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, विनायक पराते हे थेट बसच्या चाकाखाली आले. चाकाखाली चिरडले गेल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच रामनगर पोलीस स्टेशनचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत मृतदेह ताब्यात घेतला असून तो उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात रवाना केला आहे. सध्या रामनगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, ताडोबा रोड हा मार्ग अत्यंत वर्दळीचा असून या ठिकाणी दिवस-रात्र वाहनांची मोठी रेलचेल असते. त्यातच रस्त्यावरील वाढते अतिक्रमण अपघातांना कारणीभूत ठरत असल्याचा संताप नागरिकांमधून व्यक्त होत आहे. काही वर्षांपूर्वी याच मार्गावर पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका तरुण मुलीचा अशाच भीषण अपघातात मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर जनक्षोभ उसळल्याने महानगरपालिका आणि पोलीस विभागाने संयुक्त मोहीम राबवून या मार्गावरील अतिक्रमण काढून रस्ता मोकळा केला होता. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे काही दिवसांतच या मार्गावरील स्थिती पुन्हा ‘जैसे थी’ झाली. याच वाढत्या अतिक्रमणामुळे आज विनायक पराते यांना आपले प्राण गमवावे लागल्याने स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






